Goa : Sanqulim Kadamba Bus Stand incomplete. Dainik Gomantak
गोवा

Goa : महत्त्‍वाकांक्षी प्रकल्‍पांना ‘ब्रेक’!

Mahesh Tandel

साखळी : साखळी मतदारसंघातील (Sanqulim Constituency) नियोजित महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढे सरकलेच नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व (Leader) करतात. तरीही ही स्थिती असल्याने लोकांत नाराजी आहे. साखळी शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. पण, वाहतूक कोंडीचा (Vehicals Block) प्रश्न काही सुटलाच नाही आणि रस्ता रुंदीकरण (Road work) करताना सगळ्यांचे रुसवे फुगवे, हेवेदावे, राजकीय लाभार्थ्यांचा विचार केला, तर रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न कधीच सुटणारच नाही, एवढी नकारात्मकता आली आहे.

मतदारसंघात साखळी हे एक लहानसे शहर व त्याला विर्डी, अर्धे खालचे हरवळे, अर्धे हरवळे जोडून साखळी ही एकमेव पालिका व न्हावेली, कुडणे, आमोणा, वेळगे, सुर्ल, पाळी व अर्धे वरचे हरवळेसह तयार केलेली पाच प्रभागात मिळून जेमतेम सगळीच दोन हजार मते असलेली हरवळे पंचायत मिळून सात पंचायती आहेत.

नवीन बसस्थानक काम रेंगाळले
साधनसुविधा महामंडळातर्फे आमदार डॉ. प्रमोद सावंत हे महामंडळाचे उपाध्यक्ष असताना साखळीचे बसस्थानकाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर डॉ. सावंत हे महामंडळाचे अध्यक्ष, विधानसभेचे सभापती व मुख्यमंत्री झाले. पण, अद्याप बसस्थानक पूर्ण होऊन लोकार्पण झालेले नाही. सत्ताधारी आमदार, मुख्यमंत्री डॉ. सावंत व विरोधी साखळी पालिका यांच्यातील कथित वादामुळे पालिका क्षेत्राच्या विकासाला आडकाठी येत आहे. विर्डी-आमोणा पुलाचा फायदा साखळी, होंडा, कारापूर आदी भागातील लोकांना होत नाही. कारण, या साखळीहून विर्डीला जाण्यासाठी पर्यायी रस्ताच उपलब्ध नाही.

विकासाचे श्रेय ‘खाशें’ना!
साखळीला विकासाचे स्वप्न दाखवले ते ज्‍येष्ठ ‘खाशें’नी म्हणजेच पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी. ते गोव्याचे १६ वर्षे मुख्यमंत्री होते. अनेक प्रकल्प आणून साखळीत विकासाची गंगा आणण्याचे श्रेय राणे त्‍यांनाच जाते. जुने कदंब बसस्थानक, जुने सरकारी हॉस्पिटल, सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, सरकारी कॉलेज, सरकारी बहुउद्देशीय सभागृह, क्रीडा प्रकल्प, समाज सभागृह यासह अन्‍य विकासकामांचा समावेश होतो. या भागाचे माजी आमदार स्व. चंद्रकांत वेरेकर, माजी आमदार स्व. गुरुदास गावस, माजी आमदार प्रताप गावस यांनी काँग्रेस सरकारच्या सहकार्याने मतदारसंघाचा विकास पुढे नेला. माजी मंत्री डॉ. सुरेश आमोणकर यांनीही भाजप सरकारच्या साहाय्याने विकासासाठी प्रयत्न केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT