Goa : In the felicitation programme of Covid warriors at Kelshim Curtalim, Dr. Health Minister Vishwajit Rane felicitating Sukor Quadrosh. MLA Elena Saldhana, Father Travasinho Gudinho, Dr. Juze Disa and Dr. Rajendra Borkar and others.  Dainik Gomantak
गोवा

Goa : कॅन्‍सर इस्‍पितळासाठी २७० कोटी मंजूर

Goa : आरोग्‍यमंत्री विश्‍वजित राणे : केळशी येथे कोविड योद्ध्यांचा सत्‍कार

Mahesh Tandel

कुठ्ठाळी : कोरोना (Covid 19) महामारी संकटामुळे आरोग्य खात्यामध्ये (Health Department) काम करणाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अशा कठीण परिस्थितीत सर्वांनी एकत्रितपणे सेवा बजावली. कोविडवर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्च पातळीवर आम्हालाही व्यवस्थापनाबाबत शिकावे लागले. सध्या गोवा वैद्यकीय इस्पितळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या आपण राज्यासाठी कॅन्सर इस्पितळाचे (Cancer Hospital) बांधकाम करण्यासाठी २७० कोटी मंजूर केलेले आहेत. तसेच नर्सिंग प्रशिक्षण देण्यासाठी आणखी संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्य खात्यामध्ये काम करणाऱ्यांना स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे, असे गौरवोद्‍गार आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काढले.

कुठ्ठाळी - केळशी येथील सेंट ॲन चर्चच्या सभागृहात कुठ्ठाळी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने कोविड योद्ध्यांच्‍या सत्कार कार्यक्रमात आरोग्‍यमंत्री बोलत होते. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्‍ढाणा, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा, प्रमुख आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर, चर्चचे धर्मगुरू फा. ट्रावासिन्हो गुदिन्हो, कुठ्ठाळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुकोर क्वाद्रोश यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कोविड योद्ध्यांचे कौतुक
आमदार एलिना साल्ढाणा यांनी डॉ. सुकोर क्वाद्रोश व इतर वैद्यकीय डॉक्टर तथा कर्मचारी वर्गांची भरभरून कौतुक केले. नि:स्वार्थ सेवेमुळेच अनेकांचे प्राण वाचले. त्यामुळे कार्याची पावती म्हणून हा सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. यावेळी आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा म्हणाले, गेल्या दीड वर्षापासून दाबोळी विमानतळावर कोविड प्रतिबंधक चाचण्‍यांचे काम सुरू आहे. डॉ. राजेंद्र बोरकर यांनी आपल्या भाषणात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा लक्ष्‍य असल्याचे सांगितले. फादर ट्रावासिन्हो गुदिन्हो यांचेही समयोचित भाषण झाले. यावेळी एकूण ८२ कोविड योद्ध्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. प्रांजली प्रसाद यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गौरीश बोरकर यांनी सूत्रसंचालन, डॉ. अनुषा नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT