Goa:समर्पित, सेवाभावी ‘सर्पमित्र’ : प्रदीप गवंडळकर

४३ किंग कोब्रा, तसेच ५०० इतर सर्प पकडण्याचा विक्रम
Goa Snake Friend Pradip Gavandalkar
Goa Snake Friend Pradip GavandalkarDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई : कुठल्याही प्रकारचा साप म्हटला की अंगावर काटा येतोच. मनुष्य साध्या दिवडाही एकदम दचकतो. सापाला पकडण्याची हिंमत सहसा कोण करत नाही. त्यासाठी बरेच धारिष्ट्य लागते. समाजामध्ये साप पकडणारे अनेक लोक आहेत. पण वाळपई येथील प्रदीप गवंडळकर (Pradip Gavandalkar) हे रसायन मात्र विरळाच म्हणावे लागेल. सेवाभावी वृत्तीने त्यांनी आजपर्यंत असंख्य विषारी, बिनविषारी सापांना पकडून एका बाजूने मनुष्याला संकटातून मुक्त केले, तर दुसऱ्या बाजूने सर्पांना जीवदान देऊन पर्यावरण रक्षणाचेही कार्य केले आहे. हे कार्य करताना ते कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाहीत. उलट पदरमोड करून दूरच्या ठिकाणी जाऊन सापांना पकडून जीवदान देत आले आहेत. प्रदीप गवंडळकर (Pradip Gavandalkar) यांचा जन्म दांडेली (कर्नाटक) (Dandeli Karnataka) येथे झाला. वाळपईत आल्यावर त्यांनी अनेक चांगली माणसे जोडली. गवंडळकर यांचा शिवणकामाचा लहानसा व्यवसाय. त्यांची समाजात खरी ओळख झाली ती सर्पमित्र या नात्याने.

Goa Snake Friend Pradip Gavandalkar
Goa: 18 सार्वजनिक मंडळांचा 'दीड दिवस' गणेशोत्सव

गेल्या आठ वर्षांत त्यांनी (Pradip Gavandalkar) सत्तरी तालुक्यात ४३ किंग कोब्रा, ५०० कोब्रा, तसेच धामण, नानाटी, हरणटोळ, अजगर, काणेर आदी विविध प्रकारचे साप पकडून त्यांना जीवदान दिले आहे. दिवसा, रात्री, अपरात्री कधीही त्यांना संपर्क साधा, गवंडळकर हातातील काम सोडून त्वरित घटनास्थळी धावून जातात. ग्रामीण भागात अगदी काळोखात जाऊन कठीण परिस्थितीवर मात करीत त्यांनी विषारी साप पकडले आहेत. ते गेली २० वर्षे विद्यार्थ्यांसोबत घनदाट जंगलात, डोंगराळ भागात पदभ्रमण मोहीमदेखील राबवितात. तसेच घनदाट जंगल, खडकाळ भागात साहसी खेळही खेळतात. सर्प, वन्य प्राणी, तसेच विहिरीत पडलेल्या प्राण्यांनाही त्यांनी जीवदान दिले आहे. प्राण्यांना वाचविण्याच्या प्रसंगात वाळपई अग्निशमन दलालाही त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे. रक्तदानासारखे पवित्र कार्यही ४० वेळा केले आहे. अशा विविध माध्यमातून सामाजिक भावनेतून त्यांनी समाजाप्रती बांधिलकी दाखवली आहे. योगासारखे निरोगी जीवनाचे कानमंत्र देणारे उपक्रमही ते घेतात. प्रदीप गवंडळकर (Pradip Gavandalkar) यांनी सर्पमित्र या नात्याने समाजाला मोठा आधार दिला आहे.

Goa Snake Friend Pradip Gavandalkar
Goa Politics: गौळी धनगर समाजाला आदिवासी दर्जा देण्यासंबंधी भाजप सरकार गंभीर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com