दवर्ली दिकरपाल पंचायतीच्यासरपंच म्हणून निधी मालवणकर तर उपसरपंच म्हणून परेश नाईक यांची आज बिनविरोध निवड झाली.  Dainik Gomantak
गोवा

Goa: दवर्ली दिकरपाल पंचायतीवर निधी मालवणकर यांची बिनविरोध निवड

या बदलाने ही पंचायत आता पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा भाजपच्या दक्षिण गोवा कार्यकारिणीचे सरचिटणीस सत्यविजय नाईक यांनी केला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: सासष्टी तालुक्यातील महत्वाच्या पंचायतींपैकी एक असलेल्या दवर्ली दिकरपाल पंचायतीच्या (Dikarpal Panchayat) सरपंच (Sarpanch) म्हणून निधी मालवणकर (Nidhi Malvankar) तर उपसरपंच म्हणून परेश नाईक यांची आज बिनविरोध निवड झाली. या बदलाने ही पंचायत आता पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा भाजपच्या दक्षिण गोवा कार्यकारिणीचे सरचिटणीस सत्यविजय नाईक यांनी केला आहे.

यापूर्वी या पंचायतीच्या सरपंच सिया वरक आणि उपसरपंच म्हणून हेरकुलान नियासो हे होते. त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून त्यांचा 6-5 मतांनी पराभव केल्यामुळे रिक्त झालेली ही पदे भरून काढण्यासाठी ही निवडणूक झाली होती. या नव निर्वाचित सरपंच ,उप सरपंचाचे नाईक यांनी नंतर फुलांचे गुच्छ भेटवून अभिनंदन केले.

दरम्यान मालवणकर आणि नाईक यांचे भाजपचे जिल्हा पंचयत सदस्य उल्हास तुयेकर यांनीही अभिनंदन केले असून यावेळी त्यांच्या बरोबर नावेलीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष मधूकला शिरोडकर व एससी मोर्चाचे उपाध्यक्ष विद्याधर आर्लेकर हे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT