Goa Education News Dainik Gomantak
गोवा

Goa Teachers Recruitment: गोव्यात NEP ची होणार प्रभावी अंमलबजावणी! शाळांमध्ये 1008 शिक्षक, 377 इन्स्ट्रक्टर्सची होणार भरती

Goa Education: केंद्र सरकारच्‍या ‘एनईपी’ची अंमलबजावणी करणारे गोवा देशातील पहिले राज्‍य ठरले. काही वर्षांपूर्वी फाऊंडेशन पातळीवर या धोरणाची अंमलबजावणी करण्‍यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) राज्‍यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यासाठी शिक्षण खात्‍याने मुख्‍यमंत्री ज्ञानपर्व योजना अधिसूचित केली असून, या योजनेअंतर्गत राज्‍यातील सरकारी आणि अनुदानित प्राथमिक, माध्‍यमिक आणि उच्च माध्‍यमिक शाळांमध्‍ये १,००८ शिक्षक आणि ३७७ इन्स्ट्रक्टर मिळून १,३८५ कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर नेमण्‍यात येणार आहेत. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

केंद्र सरकारच्‍या ‘एनईपी’ची अंमलबजावणी करणारे गोवा देशातील पहिले राज्‍य ठरले. काही वर्षांपूर्वी फाऊंडेशन पातळीवर या धोरणाची अंमलबजावणी करण्‍यात आली. त्‍यानंतर टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्‍यमिक, उच्च माध्‍यमिक शिक्षणासाठीही नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्‍यात आली आहे. या नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत नवे विषय लागू झाल्‍याने तसेच शाळेतील शिक्षणाचे तासही वाढल्‍याने अनेक शाळांमध्‍ये शिक्षक आणि इन्‍स्‍ट्रक्‍टर्सची आवश्‍‍यकता भासत आहे.

त्‍यामुळे ही कमतरता दूर करण्‍यासाठी सरकारने १,००८ शिक्षक आणि ३७७ इन्स्ट्रक्टर्सची कंत्राटी पद्धतीवर नेमणून करण्‍यासाठी मुख्‍यमंत्री ज्ञानपर्व योजना सुरू केल्‍याची माहिती संचालक झिंगडे यांनी दिली. मुख्यमंत्री ज्ञानपर्व या योजनेअंतर्गत विविध शाळांमध्‍ये नेमण्‍यात येणारे इन्‍स्‍ट्रक्‍टर्स संगीत, चित्रकला आदींसारखे विषय शिकवणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शिकविताना सुसूत्रता येईल, असे सांगण्यात आले.

प्रारंभी २० हजार रुपये वेतन

मुख्‍यमंत्री ज्ञानपर्व योजनेअंतर्गत नेमण्‍यात येणाऱ्या शिक्षक आणि इन्‍स्‍ट्रक्‍टर्सना सुरुवातीला २० हजार रुपये वेतन देण्‍यात येणार आहे. त्‍यानंतर प्रत्‍येक वर्षी त्‍यांचे कंत्राट वाढवून वेतनात तीन टक्‍क्‍यांनी वाढ करण्‍यात येणार आहे.

सलग पाच वर्षे सेवेत राहणाऱ्यांच्‍या वेतनात पाच हजार रुपयांची वाढ केली जाईल. या शिक्षक आणि इन्‍स्‍ट्रक्‍टर्सना सेवेत कायम केले जाणार नाही. त्‍यांच्‍याकडून तसा दावा होऊ नये, यासाठी तसे प्रतिज्ञापत्रही त्‍यांच्‍याकडून घेण्‍यात येणार असल्‍याचेही झिंगडे यांनी अधिसूचनेत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT