GMC  Dainik Gomantak
गोवा

GMC च्या बालरोग वॉर्डच्या स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय, सेसिल यांनी व्हिडिओ करत राणेंना केले आवाहन

सेसिल यांनी याबाबत एक व्हिडिओ करून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना याबाबत माहिती देत, एक आवाहन देखील केले आहे.

Pramod Yadav

राज्यातील प्रमुख आणि महत्वाच्या असलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील बालरोग वॉर्डच्या स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय असल्याचा आरोप आप नेत्या सेसिल रॉड्रिग्ज यांनी केला आहे. सेसिल यांनी याबाबत एक व्हिडिओ करून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना याबाबत माहिती देत, एक आवाहन देखील केले आहे.

सेसिल रॉड्रिग्ज काय म्हणाल्या?

'आरोग्यमंत्री विश्वजीत राणे GMC ला शेवटची भेट कधी दिली होती. विशेषत: लहान मुलांसाठी असलेल्या बालरोग वॉर्ड 135 ला, या वार्डमधील असलेल्या स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय आहे. कमोडची मोडतोड झाली असून, तो कार्यरत नाही. तसेच, शेजारच्या दुसऱ्या स्वच्छतागृहाची परिस्थिती देखील बिकट असून, त्याच्या भिंती अस्वच्छ आहेत. ज्या लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत असे सेसिल यांनी म्हटले आहे.'

'तसेच, येथील बेसिन दोन बंद करण्यात आले असून, फक्त एकच कार्यरत आहे.' असे सेसिल यांनी म्हटले आहे.

गोमेकॉत उपचारासाठी जाणाऱ्या आपल्या मुलांना आपण अशा प्रकारची सुविधा पुरवत आहे. आरोग्यमंत्री राणे यांनी याप्रकरणाची दखल घ्यावी असे आवाहन सेसिल यांनी केले आहे. तसेच, गोमेकॉतील उच्च प्रशासनाने देखील यात लक्ष घालून सुविधा पूर्ववत कराव्यात असे त्यांनी म्हटले आहे. कारण लोकांना आपण अशा प्रकारची आश्वासने दिलेली नाहीत असे त्यांनी म्हटलंय.

गोमेकॉत येणाऱ्या लोकांना उत्तम सुविधा देणे आपली जबाबदारी आहे. रूग्णालयातील अशा लहान गोष्टींकडे लक्ष देणे तेथील प्रशासन आणि उच्च पदस्थ लोकांची जबाबदारी आहे. असे सेसिल यांनी त्यांच्या व्हिडिओत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT