शैलेंद्र वेलिंगकर

 

Dainik Gomantak

गोवा

GMC जॉब स्कॅम हा गोव्यातील सर्वात मोठा स्कॅम : शैलेंद्र वेलिंगकर

गोवा भाजपमध्ये आपण कल्पना करू शकत नाही अशा स्तरावर भ्रष्टाचार सुरू आहे. आणि याचेच एक उदाहरण म्हणजे जीएमसी (GMC) मध्ये झालेला नोकरभरती घोटाळा. जीएमसीमधील नोकरभरती हा गोव्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यातील राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका देखील सुरूच आहे. या दरम्यान बरेचसे घोटाळे समोर येत आहेत. गोव्यातील अधिकाऱ्यांकडून झालेले भ्रष्टाचार आता हळूहळू जगासमोर आणले जात आहेत. नुकतेच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर देखील कमकुवत मुख्यमंत्री म्हणून टीका करण्यात आली.

यातच आता सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र वेलिंगकर (Shailendra Welingkar) यांनीदेखील टीका केली आहे. ते म्हणाले की, 'गोवा भाजपमध्ये आपण कल्पना करू शकत नाही अशा स्तरावर भ्रष्टाचार सुरू आहे. आणि याचेच एक उदाहरण म्हणजे जीएमसी (GMC) मध्ये झालेला नोकरभरती घोटाळा. जीएमसीमधील नोकरभरती हा गोव्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. आणि या घोटाळ्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane), जीएमसी डीन डॉ. बांदेकर (Shivanand Bandekar), जीएमसी प्रशासन संचालक दत्ताराम सरदेसाई आणि जीएमसीचे भरती प्रमुख कालिया गावकर ही जबाबदार आहेत', असा आरोप देखील त्यांनी केला आहे. यासंदर्भात ते पुढे म्हणाले की, 'या सर्व विषयावर मी वकिलांशी सल्ला-मसलत केली असून मी लवकरच कोर्टातही जाणार आहे.

ते म्हणाले की, जीएमसीचे डीन आणि प्रामुख्याने जीएमसी प्रशासन संचालक दत्ताराम सरदेसाई यांनी विश्वजित राणे यांच्या सांगण्यावरून फसवणूक करून नियुक्तीपत्रे दिली. आरोग्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार 1371 पदांवर नियुक्तीपत्रे देण्यात आली होती, असा आरोप वेलिंगकर यांनी केला असून, त्यांच्याकडे संपूर्ण कागदोपत्री पुरावे आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. विश्वजित राणे यांनी दिलेल्या तथाकथित रोजगाराबाबतही त्यांनी सतरीच्या लोकांना इशारा दिला आहे. आता यावर मुख्यमंत्री आणि विश्वजित राणे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT