GMC Doctor Suspension Withdrawn: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) रुग्णालयातील डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या निषेधार्थ आंदोलन सुरु करण्याच्या निर्णयाला आता कायमचा पूर्णविराम लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवार (दि.१०) रोजी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांसह डॉ. रुद्रेश कुट्टीकर आणि आंदोलकांची भेट घेतली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या ऐकल्या आणि त्यानंतर या वादाला पूर्णविराम लावला आहे. मुख्यमंत्री, जीएआरडी, जीएमसी डीन आणि जीएमसी प्राध्यापकांमध्ये झालेल्या बैठकीनंतर जनहितासाठी संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आंदोलकांनी माध्यमांना दिली आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आता एक पोलीस अधिकारी कार्यरत असेल, याशिवाय त्यांच्या सुरक्षिततेसाठी ५० पोलीस तैनाद केले जातील, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशी घटना पुन्हा घडणार नसल्याची खबरदारी घेतली जाणार आहे.
यानंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयांतील सेवा समितीचे अध्यक्षपद आरोग्य विभागाचे सचिव सांभाळतील आणि त्यांच्या देखरेखीखाली गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन, तसेच विभाग प्रमुख कार्यरत असतील अशी माहिती मुख्ख्यामंत्र्यांनी दिली आहे.
सर्वांनी त्यांच्या शब्दाचा मान राखून झाला-गेला प्रसंग मागे टाकत केवळ गोव्यातील जनतेच्या हिताचा विचार केल्याबद्दल त्यांनी डॉ. रुद्रेश कुट्टीकर आणि सर्व आंदोलकांचे आभार मनात कौतुक केलं, आणि यानंतरही डॉ. रुद्रेश कुट्टीकर गोवा वैद्यकीय महाविद्यालयातच कार्यरत असतील याची पुष्टी केली आहे.
या प्रकरणात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्याच ठिकाणी येऊन माफी मागावी अशी मागणी केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, मात्र कुठलाही सरकारी अधिकारी अशा प्रकारची मागणी करू शकत नाही
तसेच आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांच्या आधारे माफी मागितली असून त्याची एक प्रत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला दिली जाईल अशी अपेक्षा असल्याची माहिती डॉ. मधु घोडकिरेकर यांनी दिली आहे.
डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांनी त्या जागेवर येऊन नव्हे तर ज्या खुर्चीचा अपमान झाला त्या खुर्चीला किंबहुना त्या पदाची माफी मागणं महत्वाचं होतं, डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय असं डॉ. मधु घोडकिरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या प्रसंगानंतर मंगळवारी डिचोली आरोग्य केंद्रात लावलेल्या 'माध्यम व्यक्तींना प्रवेश बंदी' अशा फलकाचा गोवा पत्रकार संघाकडून निषेध व्यक्त केला गेला. मात्र ही बंदी पत्रकारांवर नसून व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफीवर असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.