Malaika Vaz Dainik Gomantak
गोवा

Green Oscar: गोमंत कन्येची जागतिक झेप; पटकावला 'वाईल्ड स्क्रीन पांडा' पुरस्कार

Wildscreen Panda Awards: जागतिक स्तरावर विख्यात असलेला ‘वाईल्ड स्क्रीन पांडा पुरस्कार’, ज्याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते, मलाइका वाझ या गोमंत कन्यने आपल्या ‘द सेक्रिफाइस झोन’ या माहितीपटासाठी मिळवला.

गोमन्तक डिजिटल टीम

Green Oscar Winner Malaika Vaz

जागतिक स्तरावर विख्यात असलेला ‘वाईल्ड स्क्रीन पांडा पुरस्कार’, ज्याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते, मलाइका वाझ या गोमंत कन्येने आपल्या ‘द सेक्रिफाइस झोन’ या माहितीपटासाठी मिळवला.

‘ऑन स्क्रीन टॅलेंट’ विभागात या माहितीपटाने हे सन्माननीय स्थान मिळवले. इंग्लंडमधील ब्रिस्टल या शहरात हा पुरस्कार सोहळा गेल्या शुक्रवारी पार पडला

हरित धरतीच्या गंभीर चिंतेचे एक अंग पडद्यावर मांडल्यामुळे गोव्यात जन्मलेली मलाइका वाझ  या पुरस्काराबरोबर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या निवडक गटात समाविष्ट झाली आहे. निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

ब्रिस्टल (Bristol) मध्ये दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात येणारा ‘वाईल्ड स्क्रीन महोत्सव’ (Wildscreen Festival) हा वन्यजीवांच्या कथा पडद्यावर मांडणाऱ्याचा महत्त्वाचा जागतिक मेळावा असतो. वाईल्ड स्क्रीन पांडा पुरस्कार (Wildscreen Panda Awards) हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असते, जे उत्कृष्ट वन्यजीव संबंधित माहितीपट निर्मितीला प्रदान केले जाते.

मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका (National Geographic Sponsored Researcher) आहे. ‘नॅशनल जिओग्राफिक’चे एक पान मलाइका वाझबद्दल माहिती देताना म्हणते, ‘तिला सुरुवातीपासूनच माहित होते की ती साहसासाठी जन्मलेली आहे.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोव्यात तिचे लहानपण निसर्गाने वेढलेले होते. भारतातील तिच्या घराच्या जवळ असलेल्या किनाऱ्यावर मान्ता रे (पाकट मासा) प्रजातीच्या प्रेमात पडल्यावर तिला आढळले की त्यांची अतिरिक्त प्रमाणात शिकार केली जात आहे. या समस्येच्या मुळशी जाण्यासाठी तिने सीफूड व्यापारी बनवून भारत चीन आणि म्यानमारच्या काही भागांमध्ये तस्करांचा शोध घेतला.

इंटरनॅशनल युनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचरनुसार ही धोक्यात आलेली मत्स्य प्रजाती त्यांच्या गिलप्लेटसाठी मारली जात असते. अंगावर शहरा आणणारे आपले अनुभव तिने तिच्या पूर्वीच्या ग्रीन ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या ‘पॅंग यू साई’ या माहितीपटात मांडलेले आहेत.’

उत्तर गोव्यातील साळगाव या गावात लहानाची मोठी झालेली मलाइका सांगताना म्हणते, ‘सत्य हे आहे की आम्हाला खरोखर 10 उत्कट, समर्पित पर्यावरणवाद्यांची गरज नाही मात्र आम्हाला शेकडो किंवा दशलक्ष लोक हवेत जे त्या आपल्या परिसरात थोडे-थोडेसे करू शकतील आणि तिथे बदल घडवून आणू शकतील.‌ हाच खरा गुणाकार असेल.’

नॅशनल जिओग्राफिकच्या सहकार्याने तिने आतापर्यंत अनेक माहितीपट बनवले आहेत. तिच्या मते पर्यावरणीय कथांच्या विविध पैलूंना समजून घेणे हे एक प्रकारे रोमांचकारी आहे. ‘तुम्ही जेव्हा पर्यावरणीय प्रदूषणाविषयी किंवा वन्यजीव तस्करीबद्दल किंवा सार्वजनिक आरोग्याबद्दल कथा मांडता तेव्हा त्या तिन्हींचा एकमेकांशी खात्रीने संबंध असतो. बाहेरून एखाद्याला हे कदाचित तीन पूर्ण भिन्न विषय वाटू शकतात परंतु सत्य हे आहे की हे तीनही विषय एकमेकांशी जोडलेले आहेत.’

द सेक्रिफाइस झोन

नवी दिल्ली, ढाका, बॅटन रुज (यूएसए) आणि ला गुजीरा (कोलंबिया) येथील चार कुटुंबांच्या कथा 'द सॅक्रिफाइस झोन' (The Sacrifice Zone) या माहितीपटात मांडण्यात आल्या आहेत. ही चार कुटुंबे प्लास्टिक, फास्ट फॅशन आणि पॉवर प्रेरित प्रदूषणामुळे त्रस्त आहेत. हा माहितीपट अशा लोकांबद्दल बोलतो ज्यांना प्रदूषणकारी उद्योगांच्या वाढीमुळे आर्थिक लाभ कमीत कमी मिळतात परंतु या उद्योगांचे सर्वात अधिक विनाशकारी परिणाम त्यांनाच सहन करावे लागतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT