World Tiger Day Dainik Gomantak
गोवा

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

World Tiger Day: वाघांच्या संवर्धनाबदल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करणे ही जागतिक व्याघ्र दिनामागची भूमिका आहे. गेल्या काही वर्षात गोव्याच्या भागात वाघ आढळून आले आहेत.

Sameer Panditrao

Tigers In Goa:वाघांच्या संवर्धनाबदल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे ही आजच्या जागतिक व्याघ्र दिनामागची भूमिका आहे. दरवर्षी २९ जुलै रोजी  जगभरात वाघांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो.

हा दिवस साजरा करण्याची घोषणा २९ जुलै २०१० रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे करण्यात आली होती, ज्याचा उद्देश जगभरातील वाघांचे संवर्धन आणि व्यवस्थापन विकसित करण्यासाठी सर्व व्याघ्र प्रदेशयुक्त सर्व देशांना एकत्र आणणे हा होता. हा दिवस या भव्य आणि रुबाबदार प्राण्यांसमोरील आव्हाने आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो.

व्याघ्र अभयारण्य हा वाघांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या भक्ष्यांच्या वाढीसाठी उपयुक्त असलेला अधिवास असतो. गेल्या काही वर्षात पश्चिम घाटाच्या गोव्याच्या भागात वाघ आढळून आले आहेत.

2022 मध्ये वनविभागाने गोव्यात सहा वाघांच्या दिसण्याची नोंद केली. केरकर यांच्यासारख्या पर्यावरण तज्ञांच्या मते, खादे क्षेत्र व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठी वाघांची किमान संख्या तेथे असणेही आवश्यक नाही. वाघांना त्यांची शिकार मिळण्यास  पुरेसा असलेला कोणताही नैसर्गिक अधिवास व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर केला जाऊ शकतो.

गोव्यातील म्हादई वन्यजीव अभयारण्यात 2020 मध्ये झालेल्या वाघांच्या मृत्यूच्या घटना फार चिंतेच्या होत्या. राज्यात व्याघ्र प्रकल्पाची दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी या घटनेमुळे पुन्हा जोरदारपणे रेटली गेली. गोव्याच्या पश्चिम घाटात वाघांना संरक्षण मिळावे यासाठी नेटाने प्रयत्न सुरू झाले आणि अजूनही होत आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT