Devendra Fadnavis, Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

पणजीत रंगणार 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन! देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन; अनिल खंवटे, महेश मांजरेकरांचा होणार सम्मान

21st World Marathi Literary Conference: जागतिक मराठी अकादमीच्या वतीने २१वे जागतिक मराठी साहित्य संमेलन ९ ते ११ जानेवारीदरम्यान पणजी येथील कला अकादमीत आयोजित करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जागतिक मराठी अकादमीच्या वतीने २१वे जागतिक मराठी साहित्य संमेलन ९ ते ११ जानेवारीदरम्यान पणजी येथील कला अकादमीत आयोजित करण्यात आले आहे. पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनाला महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, गोव्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. देश-विदेशातील लेखक, विचारवंत, कलाकार, अभ्यासक आणि रसिक मोठ्या संख्येने या तीन दिवसांच्या साहित्य पर्वात सहभागी होणार आहेत.

पहिल्या दिवशी चित्रपट, संगीत, नाट्य व लोककलेवर आधारित कार्यक्रम होतील. ‘चित्रपटातील मराठी माणूस’, ‘लक्ष्मीची पावले’, ‘चंद्रभागेच्या तीरावर’ यांसारखे सादरीकरण व चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. सायंकाळी पुरस्कार वितरण सोहळ्यात अनिल खंवटे यांना ‘जागतिक मराठी भूषण’ तर महेश मांजरेकर यांना ‘कला जीवन गौरव’ प्रदान केला जाणार आहे.

दुसऱ्या दिवशी कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, माध्यमे, पर्यटन, जागतिकीकरण व मातृभाषा यांसारख्या विषयांवर परिसंवाद होतील. चित्रकला, शिल्पकला आणि काव्य यांचा संगम असलेले सादरीकरण तसेच नाट्य व चित्रपट संवादही रंगणार आहेत.

तिसऱ्या दिवशी जागतिक अर्थव्यवस्था, समुद्रसंपत्ती, क्रीडा, समाजकारण आणि चित्रपटातील सामाजिक आशय यावर चर्चा होणार आहेत. समारोप समारंभास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

परदेशातील कलाकारांना मायदेशाशी जोडणार!

या संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागतिक पातळीवर संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. परदेशात वास्तव्यास असलेल्या मराठी लेखक, कवी, अभ्यासक व कलाकारांना मायदेशाशी जोडण्याचे हे एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. जागतिक घडामोडींवर मराठी दृष्टिकोनातून विचार मांडणे, हा संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panchank Rajyog 2026: धनु राशीत मंगल-वरुणचा मिलाफ! 'पंचांक योग' उजळवणार 'या' 3 राशींचं नशीब; 7 जानेवारीपासून सुवर्णकाळ

"उद्या भारतासोबतही असं घडू शकतं..."; निकोलस मादुरोंच्या अपहरण प्रकरणावर काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य; सोशल मीडियावर पेटला वाद VIDEO

Kartik Aaryan: गोव्यातील सुट्ट्या अन् आता स्नॅपचॅट वाद! कार्तिक आर्यनच्या 'त्या' व्हायरल स्क्रीनशॉटने खळबळ; काय नेमकं प्रकरण?

मोपा विमानतळावरील वाहन प्रवेश शुल्कावरून 'GMR'ला शो-कॉज नोटीस; 7 दिवसांत मागितला खुलासा

Arpora Nightclub Fire: "सरपंचाला का बनवताय बळीचा बकरा?" बिर्च बाय रोमिओ दुर्घटनेबाबत सरदेसाईंचा रोखठोक सवाल; विधानसभेत उठवणार आवाज

SCROLL FOR NEXT