Goa CM Pramod Sawant Birthday 
गोवा

Pramod Sawant Birthday: PM मोदींनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा, सावंतांनी जनतेकडे काय मागितले बर्थडे गिफ्ट?

Goa CM Pramod Sawant Birthday:गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज आपला 51वा वाढदिवस साजरा केला.

Pramod Yadav

Goa CM Pramod Sawant Birthday

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज आपला 51वा वाढदिवस साजरा केला. दोन्ही मतदाररसंघात भाजपला निवडून द्या, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची आपल्याकडून भेट असेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नेते, कार्यकर्ते, हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारताना सांगितले.

आज (बुधवारी) सकाळी साखळी मंदिरात जाऊन त्यांनी अभिषेक केला व आपल्या घरी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज वाढदिवसानिमित्त सपत्नीक साखळी येथे श्री महालक्ष्मी देवीस अभिषेक करत, अशिर्वाद घेतले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सकाळी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. गोमन्तकीयांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तसेच गोव्यात बदल घडविण्यासाठी सावंत कष्ट घेत आहेत. त्यांच्या दिर्घ आयुष्य आणि सदृढ आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो, अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या.

मुख्यमंत्री सावंत यांनी शुभेच्छांचा स्विकार करत, तुमचे नेतृत्व आणि मार्गदर्शन मला विकसीत भारत, विकसीत गोवा या ध्येयाप्रती काम करण्यास प्रोत्साहन देतो. मी गोमन्तकीयांच्या विकासाठी सदैव प्रयत्नशील असेन, असे मुख्यमंत्री सावंत यांनी मोदींच्या शुभेच्छा स्विकार करत आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Mumbai Expressway Accident: खाटूश्यामजींच्या दर्शनाला निघालेल्या प्रवाशांवर काळाचा घाला, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 8 मृत्यू, 10 जखमी

Ayush Healthcare: गोव्यातील दोन्ही आयुष इस्पितळांचे महिनाभरात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्र्यांची माहिती

Merces Court Incident: मेरशी न्यायालयात खळबळ! पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याने पोक्सो आरोपी गंभीर जखमी

IND vs WI 5th T20I, Weather Report: रोमांचक मालिका निर्णायक टप्प्यावर, पण पावसानं वाढवली धाकधूक; बंगळुरुचं हवामान ठरवणार भारत-वेस्ट इंडिज सामन्याचा निकाल

Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

SCROLL FOR NEXT