Goa: धनगर समाज बांधव Dainik Gomantak
गोवा

Goa: धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवून द्या

विनाविलंब अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा डिचोलीसह सत्तरीतील (Goa) धनगर समाज बांधवांची मागणी

दैनिक गोमन्तक

डिचोली: गोवा (Goa) राज्य सरकारने तातडीने आवश्यक ते सोपस्कार करून आजपर्यंत दुर्लक्षित आणि उपेक्षित असलेल्या राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवून द्यावा. आणि हा प्रश्न कायमचा निकालात काढावा. अशी मागणी डिचोलीसह सत्तरी तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी रविवारी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या मागणीची पूर्तता झाली नाही, तर आदिवासी म्हणून जगत असलेल्या धनगर समाजाला कडक पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. असेही समाज बांधवांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन देण्यात आल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. धनगर समाज बांधव आजपर्यंत उपेक्षित राहिले आहेत. असा दावाही समाज बांधवांनी केला आहे.

तर अस्तित्व संकटात

2003 साली धनगर समाजाला वगळून गावडा, कुणबी आणि वेळीप या समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला होता. तेव्हापासून धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यानंतर राज्य सरकारने चार ते पाच वेळा पाठविलेले सविस्तर अहवाल केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालयाने त्रुटी काढून परत पाठविले. नव्याने अहवाल तयार करण्यासाठी मागील वर्षी राज्य सरकारने एका सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली. केंद्रीय मंत्रालयाने पाठविलेल्या सर्व अहवालांवर अभ्यास करून मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुधारीत अहवाल केंद्र सरकारला पाठविला होता.

आता हा अहवालही त्रुटी काढून केंद्रीय आरजीआय या संस्थेने परत पाठविण्यात आला असल्याने धनगर समाजात निराशा पसरली आहे. अशी माहिती बी.डी.मोटे यांनी दिली. वारंवार अहवाल परत पाठविण्यात येत असल्याने धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या दर्जाचा हक्क मिळणार तरी कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा दर्जा मिळाला नाही, तर राज्यातील धनगर समाजाचे अस्तित्व संकटात येईल. अशी भितीही धनगर समाज सेवा संघ सत्तरीचे अध्यक्ष बी. डी. मोटे यांनी व्यक्त केली. राज्य सरकारने कायदेशीर सल्ला घेवून हा प्रश्न एकदाचा कायमचा निकालात काढावा. अशी मागणीही त्यांनी केली.

अन्यथा कडक पवित्रा

अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा म्हणून गेली कित्येक वर्षे धनगर समाज संघर्ष करीत आहे. मात्र प्रत्येकवेळी समाजाच्या पदरी निराशा पडत आहे. निदान आतातरी राज्य सरकारने या प्रश्नी गांभीर्याने लक्ष घालून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या मागणीची पूर्तता करावी. अशी मागणी धनगर समाज सेवा संघांचे डिचोली तालुका अध्यक्ष दिलीप वरक यांनी केली आहे. यावेळीही उपेक्षा झाल्यास हक्क न्याय हक्क मागणीसाठी धनगर समाजाला कडक पाऊल उचलावे लागेल. असे संकेतही दिलीप वरक यांनी दिले आहेत. पत्रकार परिषदेस धनगर समाज सेवा संघ केंद्रीय समितीचे गंगाराम वरक, बिरो काळे, सगो यमकर, संदीप शिंदे, धाकटू शिंगाडे, बाबू वरक, झिलू वरक, बाबू पावणे आणि बाबू ताटे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT