विरोधी गटाच्या आमदारांना जास्तीत जास्त संधी द्याव्यात, विधानसभेतील प्रश्नांची संख्या, कॉलिंग ॲटेन्शन आणि शून्य प्रहाराची (झिरो अवर) संख्या वाढवावी आणि सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवावे, अशी मागणी करणारे लेखी निवेदन विधानसभेच्या अध्यक्ष तथा सभापतींना सादर केल्याची माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
वरील मागण्या विधानसभा कामकाज सल्लागार समितीसमोर याव्यात, अशी विनंती या निवेदनाद्वारे सभापतींकडे केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विरोधी पक्षाचे आमदार उपस्थित होते.
आलेमाव म्हणाले, आपली जीवनदायिनी म्हादई नदीचे पाणी वळविण्यास केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या कळसा-भांडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला (डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट) दिलेली मान्यता मागे घेण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. म्हादई मॉनेटरिंग कमिटीचा अहवाल सरकारने सार्वजनिक झाल्याने राज्यभर संताप व्यक्त होत आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) प्रकाशित केलेले अहवाल राज्यातील दोन्ही जिल्हे ‘भूस्खलन प्रभावित'' म्हणून घोषित झाले आहेत. इस्रोचा आणखी एक अहवाल सांगतो की, दहा वर्षांत किनारपट्टीच्या धुपीमुळे राज्याने सुमारे 29 हेक्टर जमीन गमावली असून ती चिंतेची बाब आहे.
गोव्यातील वाढत्या बेरोजगारीचे प्रमाण आणि एलपीजीच्या सातत्याने वाढीव दरवाढीमुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जीवघेण्या अपघातांत वाढ झाल्याबद्दल जनतेच्या मनात भीती आणि चिंता आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत सरकारच्या तयारीबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. राज्यातील जनतेला अपेक्षा आहे की, त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी गोवा विधानसभेत या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि विचारविनिमय करतीलय जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे, हे विधानसभेचे सदस्य म्हणून आपले कर्तव्य असल्याचे आलेमाव यांनी नमूद केले.
प्रमुख मागण्या अशा ...
आगामी अधिवेशन किमान दोन ते तीन आठवड्यांचे असावे.
जनतेच्या भवितव्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा.
अपेक्षित माहिती मिळण्यासाठी 5 वरून किमान 7 ते 10 उपप्रश्न विचारण्यासाठी मिळायला हवेत.
विरोधी पक्षाच्या आमदारांना 5 ते 7 कॉलिंग अटेन्शनची परवानगी द्यावी.
अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा गोवा नियम 258 नुसार व्हावी.
सर्व सदस्यांना अर्थसंकल्पावर बोलण्याची संधी आणि वाढीव वेळ मिळावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.