Give priority to innovate new art
Give priority to innovate new art Dainik Gomantak
गोवा

Goa: नाविन्यपूर्ण कलेला प्राधान्य: बिंदिया भानुदास गवंडी

दैनिक गोमन्तक

मोरजी: कोरोनाचा महामारीचा (Corona) काळ आहे म्हणून पायावर पाय उडवून डोक्याला हात लावून चिंतीत होण्यापेक्षा जी कला आपल्याकडे आहे , त्या कलेचा या काळात उपयोग करा. काहीच कामधंदा नाही म्हणून घरात बसून सरकारला (Government) दोष देण्यापेक्षा एकाद्या शेतात पिकवत असलेले उत्त्पन्न जरी आपण रस्त्यावर(Road) घेवून बसलो तरीही उदरनिर्वाह होवू शकतो. कामधंदा नाही म्हणून जगाव कस हे निराशावादी विचार मनातून काढून टाका आणि जी आपल्या अंगी कला आहे तिचे नाविन्यपूर्ण रुपात जनता जनार्धन समोर सादर करा. ते मग नक्कीच दाद देतील असे प्रांजळ मत पार्से येथील गणेशमूर्ती करणाऱ्या बिंदिया भानुदास गवंडी या स्त्री कलाकाराने व्यक्त केले .

बिंदिया भानुदास गवंडी ह्या मागच्या २५ वर्षापासून फक्त मातीच्या गणेशमुर्त्या करत आहेत , जोपर्यंत माती मुलायम आहे तो पर्यंत त्यातून सुबक मूर्ती घडवण्याची कला तिने आपले सासरे मुरारी गवंडी यांच्याकडून शिकवून घेतली आहे . त्या बळावर ती कोणत्याही आर्थिक संकटाचा सामना करू शकते , घरकाम सभोवतालची कामे घरसंसार सांभाळूनही ती जून महिना लागला कि तिला गणेश मूर्ती करण्याचे वेध लागलेले असतात .लहान पासून मोठे गणपती ती आपल्या चित्र शाळेत बनवते आणि त्यानंतर म्हापसा या ठिकाणी विक्रीस ठेवते .

बिंदिया गवंडी यांनी बोलताना अगोदर कुठलीही कला जर आत्मसात करायची असेल तर त्याची आवड आणि सवड असावी लागेल , आज काल सर्रास युवा पिढी मातीत हात घालायला तयार नाही असा आरोप केला जातो , मातीत हात घालण्यासाठी त्या युवकाना योग्य ते मार्गदर्शन आणि पाठींबा मिळाला तर ती युवा पिढी नक्कीच या मातीत हात घालून नाविन्यपूर्ण कला सादर करू शकतात असा विश्वास व्यक्त केला .

पाहून मातृत्वाला किती आनंद

आपली दोन्ही मुल श्रद्धा आणि साईश या मातीत रमतात हे पाहून मातृत्वाला किती आनंद होतो हे शब्दाने सांगता येणार नाही . आपल्या कलेचा वारसा ज्यावेळी आपली पुढील पिढी आत्मसात करते त्यावेळी मन भरून येते , ती दोन्ही मुले आपल्याला मुर्त्या बनवण्यासाठी मदत करतात , मुलगी श्रद्धा गवंडी हि नाट्य कलाकार आहे .तीही कला जोपासत असताना उच्चमाध्यमिक विधालायात विधार्थ्याना शिकवते , साहित्याक्षेत्रातहि शिवाय सूत्रसंचालन करते , हा सर्व व्याप सांभाळुनी ती गणेश मुर्त्या बनवण्यासाठी , रंगकाम करण्याचे काम करते . मुलगा साईश मूर्ती साठी लागणारी माती मुलायम करून देतो , हल्ली मातीचे काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने या कामात आपल्या मुलाने लक्ष घातले आहे .

मातीचे भांडार भरपूर

पेडणे तालुक्यात वारखंड आणि मांद्रे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपतीची माती उपलब्ध आहे . मातीचे काम जो मूर्तिकार करतो ती मूर्ती सुबक बनते , रंगकामहि उठाव दिसते , एवढी माती तालुक्यात उपलब्ध असूनही काही जण मुद्दाम बाहेरून प्लास्टर ऑफ पेरीस च्या मुर्त्या आणून विक्री करतात त्या मुर्त्या स्वस्त असतात .

पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या मुर्त्या

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मातीच्या मुर्त्या महत्वाचे आहे , त्या विसर्जित केल्यानंतर काही मिनिटांनी विरघळून जातात .मात्र प्लास्टर ऑफ पेरीसच्या मुर्त्या पर्यावरणाला हानिकारक आहेत , त्यामुळे कुणीही त्याचा वापर करू नये असे मत बिंदिया गवंडी यांनी व्यक्त केले .

मुर्त्या करत असताना त्या मूर्तीत आपण जीव घातला तर ती मूर्ती आणखी जिवंत वाटते , कोणतीही कला हि कमी दर्ज्याची नसते , काही काही वेळा कमावण्यासाठी गमवावे लागते , मात्र मातीची कला तुम्हाला कधीच उपाशी ठेवू शकत नाही . बिंदिया गवंडी दरवषी150 पेक्षा जास्त मुर्त्या करतात , कोरोना काळात रंग मिळवताना अडचणी येतात तर दुसऱ्या बाजूने महागाईचा सामना करावा लागतो , त्यावर मात करून जर सुबक मूर्ती बनवली तर ग्राहक सुद्धा सांगेल तो भाव द्यायला तयार असतात .

युवा पिढीनी हि कला पुढे नेण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन घेवून तिचे जतन करावे ती कला तुम्हाला कधीही उपाशी रहायला देणार नाही असे मत बिंदिया गवंडी यांनी व्यक्त केले .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT