Pernem  Dainik Gomantak
गोवा

Pernem News : शहरातील नव्हे, गावातील शाळेला प्राधान्य द्या : राज्य महिला आयोग अध्यक्षा रंजिता पै

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News : पेडणे, विद्यार्थ्यांना सक्षमपणे घडविणाऱ्या शाळा गावागावात असताना पालकांनी आपल्या हट्टापाई मुलांना शहरातील शाळेत न पाठवता गावातच त्यांचे करिअर घडवावे. गावातील शैक्षणिक संस्थांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्य महिला आयोग अध्यक्षा रंजिता पै यांनी केले.

कोरगाव येथील श्री कमळेश्वर शिक्षण प्रसारक संस्था संचालित श्री कमळेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या.

यावेळी माजी विद्यार्थी तथा डिचोलीचे पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, कोरगावच्या सरपंच अनुराधा कोरगावकर, संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्याम शेट्ये, चेअरमन परशुराम गावडे, व्यवस्थापक अरविंद गावडे, सचिव नीलकंठ थळी, उपाध्यक्ष अशोक रेडकर,

कृष्णा गावडे, कार्यकारिणी सदस्य नवसो गवस, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुनील शेट्ये, प्राचार्य जुही थळी, कमळेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक भालचंद्र हिरोजी, पेठेचावाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक आत्माजी नाईक, माजी मुख्याध्यापक रजनीकांत गावडे, बारावीत प्रथम आलेले विद्यार्थी अनिशा कुएल्हो, नरेश चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर व सरपंच अनुराधा कोरगावकर यांनी विचार मांडले.यावेळी बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा रोख व ट्रॉफी बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

‘सोशल मीडिया’त अडकू नका

डिचोलीचे पोलिस निरिक्षक दिनेश गडेकर म्हणाले की, माझे व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या कमळेश्वर हायर सेकंडरी या माझ्या शाळेस मी आयुष्यात विसरू शकणार नाही.

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या जाळ्यात न अडकता त्याचा सुयोग्य वापर करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT