Goa Garbage Collection Dainik Gomantak
गोवा

Goa Garbage Collection : ‘कचरा द्या, पैसे घ्या’ योजना ठरतेय लोकप्रिय

वर्षभरात 100 टनांपेक्षा जास्त कचरा गोळा; ‘अय्या’ संस्था आणि मनपाचा उपक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Garbage Collection : संपूर्ण जगाबरोबरच आपल्‍या देशाला आणि गोव्‍यालाही कचऱ्याची समस्‍या भेडसावत आहे. रोज हजारो, लाखो टन कचरा निर्माण होतोय. यावर उपाय म्हणून आता विविध उपक्रम राबवले जात आहेत. पणजी महापालिका आणि अय्या वेस्ट मॅनेजमेंट संस्थेच्या वतीने पणजीतील करंजाळे येथे राबविण्यात येत असलेल्‍या कचरा व्यवस्थापनाच्या ‘कचरा द्या, पैसे घ्या’ विशेष उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात 100 टनांपेक्षा जास्‍त कचरा गोळा करण्यात आला आहे. विशेष म्‍हणजे नागरिकांनाही त्यातून आर्थिक लाभ मिळत आहे.

अय्या वेस्ट मॅनेजमेंट संस्थेच्या वतीने कचरा व्यवस्थापनासाठीचे अनेक उपक्रम राबवले जातात. नागरिक, शालेय मुलांमध्ये कचऱ्याबाबत जागृती करून कचरा गोळा करण्यासाठी त्‍यांना प्रेरित केले जाते. संस्थेच्या वतीने किनारपट्टी भागातील कचरा गोळा केला जातो. सध्या ‘ओएनजीसी’च्या सहकार्याने बोटीवरील मच्छीमार बांधवांसाठी कचरा गोळा करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. समुद्रातील कचरा आणून दिल्यास त्यांना त्याचा मोबदला देण्‍यात येतोय.

विविध प्रकारचा कचरा आणि दर

या डेपोवर विविध प्रकारच्या टाकाऊ आणि कचरा स्वरूप वस्तूंच्या किमतीचे दर ठरले आहेत. त्यानुसार कार्डबोर्ड 10 रुपये किलो, मिक्स हार्ड प्लास्टिक 9 रुपये किलो, पेट 15 रुपये किलो, मऊ प्लास्टिक 5 रुपये किलो, मिक्स पेपर 3 रुपये किलो, ॲल्युमिनियम आणि फॉईल 45 रुपये किलो, मेटल 15 रुपये तर ग्लास 2 रुपये किलो दराने खरेदी केले जातात. याचा लाभ नागरिकांनाही होत आहे, अशी माहिती या डेपोचे समन्वयक आदित्य कुमार यांनी दिली.

अनोखी सेकंड हँड गिफ्ट योजना

या डेपोमध्ये आणखी एक अनोखा उपक्रम राबवला जातो व तो म्हणजे सेकंड हँड गिफ्ट योजना. या योजनेअंतर्गत आपण आपल्याकडे उपयोगात नसलेल्या वस्तू या डेपोला भेटवस्तू (गिफ्ट) म्हणून द्यायच्या आणि डेपोमध्ये असलेल्या अशा गिफ्ट स्वरूपातल्या वस्तू आपण गिफ्ट म्हणून स्वीकारायच्या. या अंतर्गत अनेक महत्त्वाच्या वस्तू परस्परांना गिफ्ट म्हणून मिळतात. शिवाय याचा वेस्ट कमी वापरासाठी आणि पुनर्वापरासाठी फायदा होतो

पुस्तक योजना मुलांसाठी फायदेशीर

याच कचरा डेपोमध्ये विद्यार्थ्यांनी वापरलेली मागील वर्षाची पुस्तके जमा करावीत आणि ज्यांना अशी पुस्तके गरजेची आहेत अशा गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना ती पुस्तके मोफत स्वरूपात द्यावीत अशीही योजना आहे. ही योजना अनेक विद्यार्थ्यांसाठी पूरक आणि आर्थिक हातभार लावणारी अशीच आहे. त्‍यास विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT