रस्त्यावरील निराधारांच्या हितार्थ आयोजित केलेली रॅली. Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील निराधारांना सन्मानाने जगण्याचा हक्क द्या !

संदीप परब: जीवन आनंद संस्थेतर्फे म्हापशात रॅली

दैनिक गोमन्तक

म्हापसा: रस्त्यांवरील निराधारांना भीक देण्याचे बंद करून त्यांना सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क द्या, असे आवाहन जीवन आनंद संस्थेचे संस्थापक तथा विद्यमान सचिव संदीप परब यांनी केले. संस्थेतर्फे म्हापसा शहरात रॅली काढल्यानंतर ते बोलत होते.

जोपर्यंत म्हापशातील रस्त्यावरील सर्व निराधार बांधवांचे पुनर्वसन होणार नाही तोवर पायांत चप्पल न घालण्याचा संकल्प करून त्याची कार्यवाहीही संदीप परब यांनी या पूर्वीच केलेली आहे.

परब म्हणाले, रस्त्यावर वंचित जीवन जगणारी देखील हाडामांसाची माणसेच आहेत. कुटुंबातील दारिद्र्य आणि इतर विविध कारणांनी आज त्यांच्यावर रस्त्यावरील वंचितांचे जीवन जगण्याची वेळ आलेली आहे. अशा रस्त्यावरच्या निराधार वंचितांना ते आपलेच देशबांधव असल्याने माणुसकीचे सन्मानजन्य जीवन जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे.

जीवन आनंद संस्थेने म्हापसा शहरातील सारस्वत विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक, रोटरॅक्ट क्लब ऑफ म्हापसा, रोटरी क्लब गोवा विभाग, म्हापसा व्यापारी संघटना, स्वयंसेवी नागरिक या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून या रॅलीचे आयोजन केले होते.संदीप परब पुढे म्हणाले, काही भिकारी व्यावसायिकपणे लोकांच्या सहानुभूतीचा फायदा घेतात आणि खरे निराधार रस्त्यावरच वंचित राहतात. यासाठी म्हापशाच्या नागरिकांनी, जनतेने निराधारांना मदत करावी; पण, मदत करण्याच्या पद्धतीत बदल करावा.

रॅलीमध्ये जीवन आनंद संस्थेच्या विश्वस्त पूनम बुर्ये, संदेश बुर्ये, संध्या खानोलकर, विश्वस्त किसन चौरे, सारस्वत विद्यालयाचे प्राचार्य संतोष पाटकर, प्रा. डाँ. जयेश च्युरी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ म्हापसाचे अमेय वरेरकर, प्रा. निता नास्नोडकर, प्रा. मुकुंद साखळदांडे, प्रशांत बर्वे, महेश स्वार, प्रा.मिलिंद सामंत, प्रणव सामंत, स्टेरेल गोदिन्हो, स्मिता श्रीवास्तव, श्रेया कामत, रिचा शर्मा, सुरेखा पाटील, मेघना देवारी यांचा सहभाग होता.

राष्ट्रोळी मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली मासळी मार्केटातून फिरून डॉ. लोहिया उद्यानात रॅलीचा समारोप करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Knife Attack: फुटबॉल सामन्यातील वादातून दोघांवर हल्ला, जुने गोवे पोलिसांकडून चौघांवर गुन्हा दाखल

Goa Tourism: पर्यटकांची गोव्‍यालाच पसंती! जानेवारी ते जुलैदरम्यान तब्बल 61 लाखांहून अधिक पर्यटकांची भेट

Fake RTO Challan: पार्सलचा बहाणा, चलनाचा धाक! सायबर ठगांचा आर्थिक हल्ला; कॉल फॉरवर्डिंग, एपीके फाइलच्या माध्यमातून गंडा

खरी कुजबुज: गटारी पार्टीत शिजले राजकारण?

VIDEO: गोव्यात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा अपघात! दुचाकीवरील बाप-लेकाला धडक दिल्याचा आरोप, स्थानिकांशी वादाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT