Arvind Kejriwal  Dainik Gomantak
गोवा

गोवेकरांनो ‘आप’ ला संधी द्या: केजरीवाल

48 तासांत आठ सभा: भाजप, काँग्रेसमुळेच विकास खुंटला

दैनिक गोमन्तक

पणजी: केवळ आपली तिजोरी भरण्यासाठी सलग निवडणुका लढणाऱ्या परंपरागत पक्षांना पाठिंबा देणे थांबवावे आणि इतर प्रामाणिक पक्षाला संधी द्या, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले. 48 तासांत आठ सभांतून उमेदवारांचा प्रचार केला.

केजरीवाल यांनी शिरोडा, बाणावली , नावेली, कुठ्ठाळी आणि वेळी येथे मोठ्या जनसभेला संबोधित केले. जनसभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला, गोव्याच्या स्थितीवर कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन केले, तरी त्याचा परिणाम होणार नाही. काँग्रेसने 27 वर्षे राज्य केले, तर भाजपने 15 वर्षे राज्य केले. तुम्ही त्यांना आणखी पाच वर्षे दिली, तर काहीही बदलणार नाही असे केजरीवाल म्हणाले.

भाजपामुळे कर्ज

भाजप-काँग्रेसवर टीका करत केजरीवाल म्हणाले, सरकारच्या भोंगळ कारभारामुळे 24 हजार कोटींचे राज्यावर कर्ज आहे. तुम्ही त्यांना पुन्हा मत दिल्यास, राज्याचे कर्ज पाच वर्षांत 50 हजार कोटी रुपये आणि नंतर 1लाख कोटी रुपये होईल. आप हा संपूर्ण कर्ज फेडेल आणि राज्याला कर्ज मुक्त करेल.

केजरीवाल यांनी आश्वासन दिले, जर त्यांचा पक्ष कामगिरी करू शकला नाही, तर ते पुढच्या वेळी मत मागायला येणार नाही. काँग्रेसला मतदान करणे म्हणजे भाजपला मतदान होईल. दिल्लीने आम आदमी पक्षाला संधी दिली, मला गोव्याने संधी द्यावी, तर गोव्याचा चौफेर विकास होईल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT