Farhan Akhtar at Chapora Fort Goa Instagram
गोवा

Farhan Akhtar: गोव्यात गर्लफ्रेन्डने केले डंप, फरहानने सांगितला 'दिल चाहता है' मधील 'त्या' सीनमागील खरा किस्सा

Farhan Akhtar: फरहान अख्तर गोवा ट्रिपवर असताना त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली आणि त्याला एकटेच माघारी यावे लागले होते.

Pramod Yadav

Actor Farhan Akhtar Shares Experience In Goa

आमिर खान, अक्षय खन्ना आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असणारा 'दिल चाहता है' हा सिनेमा फरहान अख्तरच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो.

पण, या चित्रपटातील सैफ अली खानच्या ब्रेकअप सीन फरहान अख्तरच्या वैयक्तिक आयुष्यापासून प्रेरित होता. याबाबत फरहान अख्तरने नुकतीच स्वतःहून माहिती दिली.

गोवा ट्रिपवर असताना त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली आणि त्याला एकटेच माघारी यावे लागले होते. 'दिल चाहता है' मधील सैफ अली खानचे पात्र फरहानच्या आयुष्यातील सत्य घटनेवर आधारीत आहे, असे फरहान अख्तरने सांगितले आहे.

'दिल चाहता है'मध्ये सुचित्रा पिल्लईने सैफ अली खानच्या गर्लफ्रेन्डची भूमिका साकारली होती. फरहान अख्तर नुकताच कुणाल खेमू दिग्दर्शित 'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटाचे प्रमोशन करत होता.

यावेळी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने 'दिल चाहता है'मधील या सीनच्या मागील खरा प्रसंग सांगितला.

गोवा ट्रीप दरम्यानचा माझा अनुभव सर्वात भयानक होता. मी ज्या मुलीला डेट करत होतो ती मला गोव्यात सोडून गेली. नंतर मला एकट्यानेच परतावे लागले. परत आलो त्यानंतर माझ्या आयुष्यातील बराचकाळ एकांतात गेला, तो अत्यंत दुःखद क्षण होता, असा खुलासा फरहान अख्तरने केला.

फरहान अख्तरने नंतर हेअर स्टायलिस्ट अधुना अख्तरशी लग्न केले. त्यांना दोन मुलीही आहेत. पण तब्बल 17 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर फरहान अख्तरने 2022 मध्ये गायिका शिबानी दांडेकरसोबत लग्न केले.

फरहान अख्तर सध्या त्याच्या 'डॉन 3' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे, यात रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT