Girl Death in Goa Dainik Gomantak
गोवा

Girl Death : बेडवरून पडून भाटीमध्ये 10 वर्षीय मुलीचा मृत्यू; अशी घडली घटना

सहावीत शिकणारी पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत टीव्ही पाहत असताना ही घटना घडली.

दैनिक गोमन्तक

Girl Death in Goa : गोव्यात भाटी नेसई येथे सहावीत शिकत असलेल्या मुलीबाबत अतिशय दुःखद घटना घडली आहे. शनिवारी राहत्या घरी पडून जखमी झालेल्या 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

मायणा-कुडतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहावीत शिकणारी पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत टीव्ही पाहत असताना ही घटना घडली. बेडवर खुर्ची ठेऊन ती टीव्ही पाहत असताना अचानक ती खुर्चीवरून खाली पडली. पडल्यानंतर तिला डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.

यानंतर तिला ताबडतोब मडगावमधील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर गंभीर अवस्थेत तिला जीएमसी येथे हलविण्यात आले. मात्र या सगळ्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, जुने गोवे येथे काल सकाळी सोमू शर्मा हा तीन वर्षांचा मुलगा हरवला होता. बराच वेळ शोधाशोध करूनही तो न सापडल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी जुने गोवे पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली.

याची त्वरित दखल घेऊन आज दुपारी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. अखेर तो मुलगा जुने गोवे परिसरातच पोलिसांना सापडला. त्याला ताब्यात घेऊन नंतर त्याचे काका राजकुमार शर्मा यांच्याकडे त्याला सोपविण्यात आले. मुलगा शोधण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल शर्मा कुटुंबीयांनी जुने गोवे स्थानक पोलिसांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

SCROLL FOR NEXT