Girish Chodankar dainik gomantak
गोवा

गिरीश चोडणकर पुन्हा ‘सरां’च्या भूमिकेत

शिक्षणावर पहिले प्रेम : पक्षाने जबाबदारीतून मुक्त केल्याने निर्णय

दैनिक गोमन्तक

पणजी : ‘माझे पहिले प्रेम शिक्षणावर आहे. मी हाडाचा शिक्षक आहे; मात्र काँग्रेसने सात वर्षांपूर्वी पक्षाची जबाबदारी दिली होती आणि ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली. आता त्या जबाबदारीतून पक्षानेच मला मुक्त केल्याने मी परत माझ्या मूळ पेशाकडे वळत आहे. 28 एप्रिलला मी पुन्हा खडू आणि फळा याकडे वळत आहे. उच्च माध्यमिकचा शिक्षक म्हणून रुजू होत आहे,’ अशी माहिती काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली आहे.

गिरीश चोडणकर हे आता राजकारणात आपली छाप पाडणार नसले तरी शाळेच्या वर्गामध्ये नक्कीच ‘सर’ म्हणून आपली प्रतिमा उंचावणार असल्याचं दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाने सर्व पाचही राज्यांतील प्रदेशाध्यक्षांना राजीनामा द्यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार गोव्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाध्यक्षांकडे पाठवला होता. तो मंजूर झाल्याने त्यांना त्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाने राज्यात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अमित पाटकर यांच्यावर सोपवली आहे. नवीन काँग्रेस कामालाही लागली आहे. त्यामुळे गिरीश चोडणकर यांनी स्वतःला पक्ष कार्यापासून बाजूला केले आहे. ते ‘सध्या काय करत आहेत’ हे जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता चोडणकर परत आपल्या ‘चॉक, ब्लॅक बोर्ड’ पेशाकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यालयात मुलांवर चांगले संस्कार घडविण्याबरोबरच त्यांना अभ्यासातही हुशार करणे ही आपली जबाबदारी आहे. या जबाबदारीत कोणतीही कसर सोडणार नसल्याचे चोडणकर यांनी सांगितले. राज्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उत्तम नागरिक बनवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाईल. प्रामाणिकपणा आणि शिस्त या गोष्टीतून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ज्ञानाची कवाडे खुली करण्यासाठी मी झटणार असल्याचे ते म्हणाले.

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर चोडणकर यांना काँग्रेसचा पराभव नक्की कशामुळे झाला? असे विचारले असता, ते म्हणाले आता मी त्या पदावर नाही. पक्षाची विश्लेषण करणारी तज्ज्ञ मंडळी यावर काम करत आहेत. मात्र, काँग्रेसचा पराभव झाला हे मानण्यास मी तयार नाही. कारण निवडणुकांपूर्वी आमच्याकडे केवळ 1 आमदार होता. या एका आमदारासह आम्ही निवडणूक लढवली होती. आज विधानसभेत काँग्रेसचे 11 आमदार आहेत. सहयोगी पक्षाचा 1 आमदार आहे. त्यापैकी 8 आमदार हे पहिल्यांदा निवडून आले आहेत. अनेक जागा अत्यंत कमी मतांनी आम्ही गमावल्या आहेत. राज्यातील 68 टक्के जनता ही सत्तेत असलेल्या भाजपच्या विरोधात आहे. हे मतदानाच्या आकडेवारीवरून सिद्ध होते; मात्र ‘मत विभाजन करू नका’ हे सांगण्यासाठी आम्ही कमी पडलो हे मान्य करावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

Jasprit Bumrah Record: 'शतक' नाही, 'त्रिशतक'! जसप्रीत बुमराह बनणार क्रिकेटचा 'ऑल-फॉरमॅट किंग', फक्त 2 विकेट्सची गरज

Ravindra Bhavan Margao: मडगाव रवींद्र भवनातील 'पाय तियात्रिस्‍त' सभागृह पुन्हा खुले, दुरुस्‍तीवर सव्वादोन कोटी खर्च; मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण

Dark Fog In Goa: पहाट ओढून घेतेय दाट धुक्‍याची चादर, सूर्यही उगवतोय विलंबानेच; काजू, आंब्यांच्या झाडांचा मोहोर करपून जाण्याचा धोका

Konkani Drama Competition: साखळीत आजपासून 'कोकणी नाट्य' स्पर्धा, मुख्यमंत्र्यांच्‍या हस्‍ते उद्‌घाटन; सत्तरी, डिचोलीतील 18 मंडळांचा सहभाग

SCROLL FOR NEXT