Girish Chodankar Congress Dainik Gomantak
गोवा

पराभवाची जाणीव झाल्यानेच दबावतंत्र : गिरीश चोडणकर

भाजपविरुध्द निवडणूक आयोगाकडे तक्रार

दैनिक गोमन्तक

पणजी : विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची जाणीव झाली आहे. त्यामुळेच टपाली मतांसाठी मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा करत काँग्रेस पक्षाने दिल्ली येथील मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Girish Chodankar News Updates)

यासंदर्भात गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करूनही अद्याप कारवाई केली नाही, अशी खंतही कॉंग्रेस (Congress) नेत्यांनी व्यक्त केली. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात अजूनही निवडणूक आचारसंहिता लागू आहे. तरीही सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांकडून टपालाने मतदान करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे.

राज्य सरकारची यंत्रणा आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करणाऱ्या मतदारांना धमकावण्याचे प्रकार सुरू केले आहेत, असे या पत्रात नमूद केले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक (Election) प्रक्रियेचे पावित्र्य व लोकशाहीची मूल्ये अबाधित ठेवण्यासाठी तातडीने आयोगाने कारवाई करावी, अशी विनंती चोडणकर यांनी केली आहे.

सरकारी यंत्रणेचा गैरवापर

टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी निवड केलेल्या पोलिस (Police) कर्मचाऱ्यांची यादी मिळवण्यासाठी भाजपने पोलिस खात्याच्या बिनतारी संदेश सेवेचा वापर केल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला होता. 17 आणि 18 रोजी पोलिस खात्याकडून सर्व पोलिस स्थानकांना हा संदेश पाठवला होता, असे चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

SCROLL FOR NEXT