Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Girish Chodankar : संकल्प आमोणकरांचे आरोप बिनबुडाचे

2007 पासून त्यांना राहुल गांधी कमकुवत असल्याचे समजले नाही, ते भाजपमध्ये जाऊन काही दिवसांतच समजले, असा टोला माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकाद्वारे हाणला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Girish Chodankar : काँग्रेसची छबी मलीन करण्याच्या उद्देशाने भाजपने सध्या भाषण तयार केले असून पक्षांतर केलेल्या आमदारांच्या तोंडून ते वाचले जात आहे. राहुल गांधींसह काँग्रेसच्‍या दिग्गज नेत्यांवर जेव्‍हा मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी जेव्‍हा टीका केली, तेव्हा ते हेच भाषण वाचत होते. 2007 पासून त्यांना राहुल गांधी कमकुवत असल्याचे समजले नाही, ते भाजपमध्ये जाऊन काही दिवसांतच समजले, असा टोला माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकद्वारे हाणला आहे.

पत्रकारांशी बोलताना आमोणकर यांची देहबोली वस्तुस्थिती सांगत होती. मंत्रिपदासाठी त्यांनी आपला आत्मा भाजपला विकला आहे. जर आमोणकर त्यांनी केलेल्या आरोपांबाबत गंभीर असते तर त्यांनी माझ्यावरही आरोप केले असते. कारण माझ्या अध्यक्षतेखाली 2022 ची विधानसभा निवडणूक लढवली होती, असे गिरीश चोडणकर म्हणाले. आमोणकर यांना सर्व प्रकारच्या संभाव्य नेतृत्वाचे व्यासपीठ देण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत ते दोनदा पराभूत होऊनही, त्यांना तिसऱ्यांदा तिकीट दिले, असे ते म्‍हणाले.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सहज रीतीने काँग्रेस फुटिरांना सोमवारी भेटीची वेळ दिली आहे, त्‍यामुळे भाजप नेत्यांनाही आश्‍चर्य वाटत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उद्या, सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह आठ भाजपातील नवे आमदार पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रीय भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. त्‍यासाठी सदर नेते रविवारी रात्री दिल्‍लीला रवाना झाले आहेत.

यापूर्वी बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील 10 जण भाजपात आले होते. त्यांना पंतप्रधानांनी कधीही भेट दिली नाही. त्याचप्रमाणे सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनाही पंतप्रधानांची भेट मिळू शकली नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे अजून पंतप्रधानांना एकटे भेटू शकलेले नाही. दिगंबर कामत यांना ज्या पद्धतीने पक्षश्रेष्ठीही महत्त्व देत आहेत व त्यांच्यासाठी दिल्लीत लाल गालीचा अंथरलेला आहे, तो पाहून स्थानिक नेते अचंबित झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 3 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पत्नीला जीवे मारण्याची धमकी; अमेरिकेतील व्यक्तीवर गुन्हा नोंद

Goa Today's News Live: डिचोलीत घुमले 'वंदे मातरम्' गीताचे स्वर

Horoscope: हाच 'तो' दिवस! ‘गौरी योग’ देणार भरपूर यश; 'या' तीन राशींसाठी मंगलवार्ता

Goa Tourist Safety: 'पर्यटकांशी गैरवर्तन खपवून घेणार नाही'! पर्यटन खात्‍याचा इशारा; जबाबदारीचे भान ठेवण्‍याचे आवाहन

Goa Politics: 'अभियंत्याला पोलिसांनी नेले, वीज मंत्री काय करीत आहेत'? पाटकरांचा सवाल; अभ्यास करण्याचा ढवळीकरांना सल्ला

SCROLL FOR NEXT