Girish Chodankar  Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: भाजपकडून देवाचा अपमान गिरीश चोडणकर यांचा आरोप

पक्षांतराचे वादळ पुन्हा सक्रिय झाल्याने, काँग्रेसने-भाजपवर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: निवडणुकीपूर्वी उमेदवारांना पक्षांतर करणार नाही, यासाठी देवाची शपथ दिली होती. परंतु, पक्षांतराचे वादळ पुन्हा सक्रिय झाले आहे. काँग्रेसने यासाठी भाजपवर निशाणा साधला आहे. देवाची शपथ मोडणाऱ्यांना पक्षात घेण्याची इच्छा दाखवून भाजपकडून देवाचा अपमान केला जात आहे, असा आरोप कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

(Girish Chodankar accuses BJP of insulting God)

कॉँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काही काँग्रेस कार्यकर्त्यांसह जाऊन पणजीतील महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पक्षांतर करण्याची शपथ मोडणाऱ्यांना सदबुद्धी देण्याचे ‘सांगणे’ केले.

चोडणकर यांनी सांगितले, काही जण पक्षांतरासाठी आतूर झाले आहेत. त्यासाठी आज येथे येऊन आम्ही सांगणे केले आहे. भाजपकडून सध्या देशात हिंदू धर्म आणि देवांच्या नावा राजकारण सुरू आहे. आता मंदिरात शपथ घेतलेल्यांना पक्षात घेण्यासाठी त्यांच्याकडून पाठिंबा दिला जात आहे. त्यांना खरोखर हिंदू धर्माची काळजी असेल, तर त्यांनी देवाची शपथ घेतलेल्यांना पक्षांतर करण्यापासून रोखले पाहिजे. मात्र, शपथ मोडणाऱ्यांना पक्षात घेण्याची इच्छा दाखवून भाजप उलट देवाचा अपमान येत आहे, असे चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT