Girijadevi Desai Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या गिरिजादेवीचा 'बादल पे पांव'! फुटबॉल प्रशिक्षणात भरारी; एएफसी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱी देशातील पहिली महिला मार्गदर्शक

Goa Football: कुंकळ्ळी येथील गिरिजादेवी देसाई यांनी फुटबॉल प्रशिक्षणात विक्रमी भरारी घेतली. एएफसी लेव्हल २ अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला फुटबॉल मार्गदर्शक ठरल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

AFC Level 2 Coaching Course Conquored by Goa's Girijadevi Desai

पणजी: कुंकळ्ळी येथील गिरिजादेवी देसाई यांनी फुटबॉल प्रशिक्षणात विक्रमी भरारी घेतली. एएफसी लेव्हल २ अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला फुटबॉल मार्गदर्शक ठरल्या आहेत.

गिरिजादेवी मडगाव येथील व्हीव्हीएम रामकृष्ण महादेव साळगावकर उच्च माध्यमिक विद्यालयात शारीरिक शिक्षण शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. यावर्षी सप्टेंबरमध्ये गुजरातमधील भावनगर येथे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने घेतलेल्या पहिल्या प्रशिक्षण तुकडीत त्यांनी एएफसी ब परवाना प्राप्त केला. या तुकडीत देशभरातील १३ उमेदवार होते आणि गिरिजादेवी त्यामध्ये एकमेव महिला होत्या.

गिरिजादेवी यांनी गोव्याच्या महिला संघ, तसेच गोवा विद्यापीठाचा महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून योगदान दिले आहे. केळशी स्पोर्टस क्लब, कुंकळ्ळी युनायटेड, सांताक्रूझ एंजल्स, चर्चिल ब्रदर्सच्या महिला संघालाही मार्गदर्शन केले आहे. शिवाय चर्चिल ब्रदर्सच्या १३ वर्षांखालील व १७ वर्षांखालील मुलांच्या संघाचेही प्रशिक्षकपद त्यांनी भूषविले आहे. भारतीय व्यावसायिक फुटबॉलमध्ये पुरुष संघाला (केळशी स्पोर्टस क्लब) मार्गदर्शन करणाऱ्या त्या पहिला महिला प्रशिक्षक आहेत. गिरिजादेवी या फुटसालमध्ये लेव्हल १ परवाना प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT