Ghumat Aarti in Goa during ganesh chaturthi
Ghumat Aarti in Goa during ganesh chaturthi  Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi : गोव्यात तरुणाई झाली घुमट आरतीत दंग

गोमन्तक डिजिटल टीम

Ganesh Chaturthi : सध्या मोबाईल हा नव्या पिढीच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. बहुतांश मुले सोशल मीडियावर रमलेली दिसतात. मात्र, याच्या अगदी विरुद्ध चित्र, दक्षिण गोव्यातील तरवळे शिरोडा गावात पाहायला मिळत आहे. येथील मुलांचा मोबाईलची सवय इतिहासजमा झाली असून, ही मुले गोव्याचे पारंपरिक वाद्य असलेल्या ‘घुमट’च्या नादात रंगून गेली आहेत. या वाद्याच्या तालात मंदिरांमध्ये सुरेल स्वरात आरती म्हणायची पद्धत आहे. विशेषतः गणेशोत्सवात होणारी ‘घुमट आरती’ ही सर्वांसाठी आकर्षणाचा विषय असते.

तरवळे-शिरोडा हा फोंडा तालुक्यातील गाव असून येथे कित्येकजण घुमट वादनात पारंगत आहेत. घुमट आरती ही गोव्यातील पारंपरिक कला असून चतुर्थीच्या काळात या प्रकाराला सगळीकडे अगदी उधाण येत असते. सध्या या वादनात रमलेल्या मुलांमध्ये चक्क दोन वर्षे वयाच्या निश नितेश नाईक याचाही समावेश असून तोही आपल्या गळ्यात घुमट अडकवून या घुमट आरत्या शिकायला जात आहे. सध्या मुले ठेका कसा धरावा आणि त्या तालावर आरत्या कशा म्हणाव्या त्याचे प्रशिक्षण घेत आहेत. आता गणेश चतुर्थीच्या काळात ही मुले या आरत्या सादर करणार आहेत. अनंत चतुर्दशीपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी या आरत्यांचे कार्यक्रम होणार आहेत. राहुल कृष्णानंद लोटलीकर हे गायक त्यांना प्रशिक्षण देत आहेत. एक नवी पिढी या कलेत तरबेज करण्याचा आमचा हा प्रयत्न असल्याचे लोटलीकर यांचे मित्र व सहकारी मयूर नाईक यांनी सांगितले.

घुमट आरत्यांच्या स्पर्धा

घुमट हे पारंपरिक वाद्य असून ते मातीपासून बनविले जाते. वरच्या बाजूने मोठे आणि खालच्या बाजूने निमुळते अशा प्रकारच्या मातीच्या भांड्यापासून ते बनविले जाते. त्याच्या वरच्या बाजूला घोरपडीचे चामडे घट्ट बांधले जाते. याच चामड्यावर थाप मारली की त्यातून विशिष्ट मात्रांचा आवाज बाहेर पडतो. त्यावर विशिष्ट ठेका धरून या घुमट आरत्या म्हटल्या जातात. राज्यात घुमट आरत्यांच्या स्पर्धाही होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT