Ganesh Chaturthi : गोव्यात जोपासली जातेय पोर्तुगीजकाळापासूनची कागदी गणपतीची परंपरा

पणजीतील म्हामय-कामत कुटुंबाकडून दीड दिवसाचे पूजन, अनंत चतुर्दशीला जल्लोषी उत्सव
Papar Ganesh | Ganesh Chaturthi | Goa Ganesh Festival
Papar Ganesh | Ganesh Chaturthi | Goa Ganesh FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

Ganesh Chaturthi : सतराव्या शतकापासून पणजीतील कामत-म्हामय कुटुंबात गणपतीपूजन होते, ती परंपरा आजतागायत आहे. पन्नासच्या आसपास या कुटुंबाची सदस्य संख्या एकत्रित येऊन आपल्या जुन्या वास्तूत गणेशोत्सव साजरा करीत आहे. पोर्तुगीज काळातील घराची ठेवण असलेला हा वाडा आजही जुन्या आठवणींना उजाळा देतो. या कुटुंबात दीड दिवसाच्या गणेशाची स्थापना होत असलीच तरी या वाड्यात अनंत चतुर्थीला होणारा उत्सव आपले वेगळेपण टिकवून आहे.

Papar Ganesh | Ganesh Chaturthi | Goa Ganesh Festival
Ganesh Chaturthi : बाप्पा नवसाला पावला; वानरमारे समाजाकडून 11 दिवस गणेशाची सेवा

पणजीतील आदिलशाहचा वाडा तथा जुने सचिवालय म्हणून परिचित असलेल्या इमारतीच्या बाजूला पश्‍चिमेला कामत-म्हामय यांची जुनी वास्तू दिमाखात उभी आहे. हरी कामत यांचा वारसा सांगणारे हे कुटुंब. माजी सनदी अधिकारी असलेले डॉ. शंकर कामत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे भाऊ व कुटुंब सदस्य या वाड्यात विविध उत्सव साजरा करतात. त्यातील गणेशोत्सव हा येथील मोठा उत्सव...

पोर्तुगीज काळात मातीची मूर्ती आणून गणेशोत्सव साजरा करता येत नसल्याने कागदावर रेखाटलेले चित्र पूजण्याची परंपरा कामत-म्हामय कुटुंबाने जपली ती आजपर्यंत. महादेव, पार्वती आणि गणपती यांचे रेखाटलेले चित्र पुजाऱ्याद्वारे पूजली जाते, देव्हाऱ्याच्या बाहेरील प्रशस्त अशा जागेत सर्व सदस्यांना एकत्रितरित्या भोजन दिले जाते. कर्नाटकातील स्वयंपाकीद्वारे सर्व स्वयंपाक करण्याची पद्धत आजही येथे दिसून येते. तसेच या भोजनासाठी केळीच्या पानाचा वापर हा नित्यनियम पाळला जातो, असे शंकर कामत सांगतात.

Papar Ganesh | Ganesh Chaturthi | Goa Ganesh Festival
Papar Ganesh | Ganesh Chaturthi | Goa Ganesh FestivalDainik Gomantak

वेरेतील कुटुंबाकडून चित्र

पोर्तुगीज काळात वेरे येथील दांडे कुटुंबाकडून आमच्या पूर्वजांना गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी शंकर, पार्वती व गणपती यांचे चित्र काढून पूजण्यासाठी दिले होते. त्यावेळी तिसवाडीत पोर्तुगीजांचे राजवट असल्याने त्यांच्या भीतीने मूर्ती स्थापन न करता कागदाचा गणपती पूजण्याची परंपरा सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जनही वाड्याच्या परसात असलेल्या विहिरीत केले जाते. आजही गणेशोत्सवात वेरेच्या दांडे कुटुंबाकडूनच आमच्यासह इतर कुटुंबांना ही चित्रे जातात, असेही कामत-म्हामय सांगतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com