Goa Ganeshchaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganeshchaturthi 2023: काणकोणात घुमतेय ‘घुमटगाज’

स्‍पर्धेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद : तब्‍बल 8विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

दैनिक गोमन्तक

Goa Ganeshchaturthi 2023: देळे-काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन आणि श्री चेतन मंजू देसाई महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीतर्फे घुमटगाज स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्‍पर्धेत प्रथम वर्ष वाणिज्य शाखेला प्रथम क्रमांक प्राप्‍त झाला.

विद्यार्थ्यांची सांस्कृतिक घडणघडण व्हावी या उद्देशाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत ८७ घुमट कलाकारांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. प्रभारी प्राचार्य डॉ. सुचेता नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

स्‍पर्धेत तृतीय वर्ष वाणिज्य शाखेला द्वितीय तर तृतीय वर्ष कला शाखेला तृतीय बक्षीस प्राप्‍त झाले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. पूर्णानंद च्यारी, केवल नाईक आणि संपदा नाईक देसाई यांनी केले.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मिथिल फळदेसाई यांनी स्वागत केले तर सांस्कृतिक सचिव समर्थ कोमरपंत यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डॉ. रुपा चारी यांनी शेवटी आभार मानले.

वैयक्तिक बक्षिसांचे मानकरी

उत्कृष्ट घुमटवादक : पहिले बक्षीस सागर देसाई (तृतीय वर्ष, वाणिज्य) तर दुसरे बक्षीस निसर्ग म्हाळशी (प्रथम वर्ष, वाणिज्य) याला मिळाले. उत्कृष्ट शामेळवादक म्हणून पहिले बक्षीस सुमीत पागी (प्रथम वर्ष, वाणिज्य), दुसरे बक्षीस विशाल भंडारी (तृतीय वर्ष, वाणिज्य) यांना प्राप्त झाले. उत्कृष्ट गायक बक्षी रोहित देसाई (प्रथम वर्ष, विज्ञान) व रश्मिता सुधीर (तृतीय वर्ष, कला) यांना अनुक्रमे बक्षिसे मिळाली.

विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधला पाहिजे. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होणे हा त्‍याचाच एक भाग असतो. म्‍हणून विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्‍ये मोठ्या संख्‍येने सहभागी होणे गरजेचे आहे.
- प्रा. डॉ. सुचेता नाईक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT