Elvis Gomes  Dainik Gomantak
गोवा

Elvis Gomes: जन्मनोंदणीची नक्कल पोर्तुगीजमध्ये उतरविणे म्हणजे नागरिकत्व घेणे नव्हे!

Elvis Gomes: भाजपने यापूर्वीच्या भूमिकेशी ठाम राहावे

दैनिक गोमन्तक

Elvis Gomes: जन्मनोंदणीची नक्कल (ट्रान्सक्राईब) पोर्तुगीजमध्ये उतरविणे म्हणजे त्या देशाचे नागरिकत्व घेणे नव्हे, ही भूमिका मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना गोव्यातील भाजप सरकारने घेतली होती. आता त्यांनी याच भूमिकेशी ठाम राहण्याची गरज आहे, असे काँग्रेस नेते एल्विस गोम्स यांनी आज सांगितले.

सध्या पोर्तुगालात जन्मनोंदणी झाल्याचे कारण दाखवून गोव्यातील नागरिकांच्या भारतीय पासपोर्टचे नूतनीकरण केले जात नाही. त्यामुळे हजारो गोमंतकीय अडचणीत आले आहेत. या पार्शवभूमीवर त्यांना त्यांची या प्रश्नावरील भूमिका काय, असे विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.

ते म्हणाले की, ज्यावेळी बाणावलीचे आमदार कायतू सिल्वा याच मुद्द्यावरून अडचणीत आले होते, त्यावेळी भाजपचे माजी आमदार आणि तत्कालीन एनआरआय आयुक्त डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून गोवा सरकारची भूमिका स्पष्ट केली होती.

आताच्या सरकारने केंद्राला हीच भूमिका योग्य कशी आहे, हे पटवून देण्याची गरज असल्याचे गोम्स म्हणाले.

भाजपला घरचा अहेर

दोन दिवसांपूर्वी मडगाव स्मशानभूमीत एका जमावाकडून दोघांना जी मारहाण करण्यात आली, त्याबद्दल विचारले असता, राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, असे भाजपचेच कार्यकर्ते म्हणू लागले आहेत. मात्र, या घटनेकडे गुन्हेगारी घटना म्हणून पाहिले पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. पण एका धर्माच्या जमावाने हा हल्ला केला म्हणून त्याला धार्मिक रंग चढवणे योग्य नाही. गुंडगिरीकडे गुंडगिरी म्हणून पाहून ती आटोक्यात आणण्याची गरज गोम्स यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT