German President Olaf Scholz | CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

जर्मन राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याचा शेवट गोवा भेटीने! विद्यार्थ्यांशी साधला संवाद; भारताबाबत केले मोठे विधान

German President Olaf Scholz Visits Goa: जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष ओलाफ स्कोल्झ यांनी आज राज्याचा धावता दौरा केला. त्यांनी मुरगाव बंदरात सदिच्छा भेटीवर आलेल्या जर्मन युद्धनौकांना भेट दिली आणि बिटस् पिलानीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

गोमन्तक डिजिटल टीम

German President Olaf Scholz Visits Goa

पणजी: जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष ओलाफ स्कोल्झ यांनी आज राज्याचा धावता दौरा केला. त्यांनी मुरगाव बंदरात सदिच्छा भेटीवर आलेल्या जर्मन युद्धनौकांना भेट दिली आणि बिटस् पिलानीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गेले तीन दिवस भारताच्या दौऱ्यावर असलेल्या स्कोल्झ यांनी दौऱ्याचा समारोप गोवा भेटीने केला.

दाबोळी येथील हंस नौदल तळावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुणबी शाल आणि पारंपरिक समई प्रदान करून त्यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय बंदर राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, शिष्टाचारमंत्री मॉविन गुदिन्हो आणि शिष्टाचार सचिव संजीत रॉड्रिग्ज उपस्थित होते.

पारंपरिक लोकगीतही त्यांच्या स्वागताच्या निमित्ताने सादर करण्यात आले. मुरगाव बंदरात नांगरण्यात आलेली जर्मन युद्धनौका बादेन वुवरटमर्ग आणि साहाय्य नौका फ्रॅंकफर्ट एम मेन यांना भेटी दिल्या. यावेळी नौदल कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.

भारताला मिळणार जर्मनीची मदत

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, येत्या काही दिवसांत जर्मनी भारताला ऊर्जा संक्रमणामध्ये मदत करण्याची भूमिका बजावू शकते. भारतातील नागरिकांच्या चांगल्या, आरोग्यदायी आणि स्वच्छ भविष्यासाठी जर्मनी आणि भारत योगदान देतील. स्कोल्झ यांनी बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले चार प्रकल्प पाहिले. प्रकल्प निर्मिती प्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT