Goa Drugs Case: पोलिसांच्या सापळ्यात अडकला ड्रग्ज विक्रेता! साडेसहा लाखांचे चरस हस्तगत; झारखंडच्या तरुणास अटक

Anjuna Crime: चिवार-हणजूण येथील फुटबॉल मैदान परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे साडेसहा लाख रुपयांचे चरस जप्त केले. याप्रकरणी संजय लिकीया दास (वय २६ वर्षे, मूळ झारखंड, सध्या रा. वागातोर) याला पोलिसांनी अटक केली.

Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News

कळंगुट: चिवार-हणजूण येथील फुटबॉल मैदान परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे साडेसहा लाख रुपयांचे चरस जप्त केले. याप्रकरणी संजय लिकीया दास (वय २६ वर्षे, मूळ झारखंड, सध्या रा. वागातोर) याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

शुक्रवारी रात्री चिवार-हणजूण येथील फुटबॉल मैदान परिसरात संजय दास हा तरुण ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक सूरज गावस आणि सहकाऱ्यांनी या परिसरात सापळा रचला. संशयित दास ठरल्यानुसार संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मैदान परिसरात येताच पोलिसांनी त्याला घेरले.

Anjuna Crime: चिवार-हणजूण येथील फुटबॉल मैदान परिसरात पोलिसांनी केलेल्या  कारवाईत सुमारे साडेसहा लाख रुपयांचे चरस जप्त केले. याप्रकरणी संजय लिकीया दास (वय २६ वर्षे, मूळ झारखंड, सध्या रा. वागातोर) याला पोलिसांनी अटक केली.
Ration Card: तब्बल 60 हजार 'रेशन कार्ड' रद्द! नागरी पुरवठा खात्याचा दणका; वापरात नसलेल्या कार्डची कसून चौकशी

यावेळी कसून तपासणी केली असता, त्याच्याकडे सुमारे ६ लाख ५५ हजार रुपयांचे चरस आढळले. दास याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पर्यटन हंगाम सुरू झाला असल्याने पोलिसांनी किनारी भागावर बारीक नजर ठेवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com