Colva Beach Dainik Gomantak
गोवा

Colva Beach: कोलवा किनाऱ्यावर ‘जिओ बॅग तंत्रज्ञान’ कार्यान्वित; समुद्राची धूप रोखण्यात होणार मदत

Colva Geo Bags Project: समुद्राची धूप रोखण्यासाठी व वाळूच्या ढिगाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोलवा समुद्र किनाऱ्यावर जिओ बॅग तंत्रज्ञान कार्यान्वित करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: समुद्राची धूप रोखण्यासाठी व वाळूच्या ढिगाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोलवा समुद्र किनाऱ्यावर जिओ बॅग तंत्रज्ञान कार्यान्वित करण्यात आले आहे. केळशी नंतर कोलव्यात या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

दरंम्यान, या तंत्रज्ञानाचा (Technology) शुभारंभ बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस, कोलवा सरपंच सुझी फर्नांडिस, जलस्रोत खात्याचे अधिकारी व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला. हा पथदर्शी प्रकल्प कोलवा समुद्र किनाऱ्यावर लॉंगिन्होस बीच रिसॉर्ट व मच्छिमारी ज्या भागात होते, त्या जवळ सुरू करण्यात आल्याची माहिती जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पाची एकूण किंमत ५ लाख रुपये असूम ती भिंत बांधण्याच्या खर्चापेक्षा कमी आहे व त्याची १० ते १५ वर्षांची हमी आहे, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

समुद्राची धूप व वाळूच्या ढिगाऱ्यांचा प्रश्न कायमस्वरुपी सरकार जो पर्यत सोडवत नाही, तो पर्यंत केळशी व कोलव्यात या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असे आमदार व्हिएगस यांनी सांगितले. हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार युरोपातील (Europe) एका एजन्सीकडे संपर्क साधून आहेत, अशी माहिती आमदारांनी दिली. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पुढाकार घेणारा वेन्झी व्हिएगस पहिले आमदार आहेत. आमदार व्हिएगस यांनी पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यावर टीका करताना सांगितले, की मंत्री पर्यावरण व किनारपट्टीच्या संरक्षणावर जास्त भर देत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT