Gelatin Explode In Goa Dainik Gomantak
गोवा

Gelatin Explode: घराच्या भिंती, छपरांचे नुकसान; अन्सोळे-भिरोंडा येथे काजू फार्ममध्ये जिलेटीनचा स्फोट, मालक ताब्यात

Gelatin Explode In Goa: नासिर काजू फार्ममध्ये ही घटना घडली असून, याप्रकरणी फार्मच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

Pramod Yadav

Gelatin Explode In Goa

वाळपई येथील अन्सोळे-भिरोंडा येथे काजू फार्ममध्ये सोमवारी रात्री जिलेटीनचा स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली. स्फोटात जवळपासचा परिसर एवढा हादरला की यात काही घरांच्या भिंती, तावदाने आणि छपरांचे नुकसान झाले आहे.

नासिर काजू फार्ममध्ये ही घटना घडली असून, याप्रकरणी फार्मच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास नासिर काजू फार्ममध्ये मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासणी केली असता, फार्मच्या एका खोलीत स्फोट झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी काजू फार्म मालक नासिर हुसेन जमादार याला ताब्यात घेऊन चौकशी केली. जमादार डोंगर फोडण्याचे काम करत असल्याने त्यासाठी त्यांनी जिलेटीनच्या कांड्या आणल्या होत्या.

काम बंद असल्याने जिलेटीनच्या कांड्या खोलीत ठेवण्यात आल्या होत्या, पण सोमवारी रात्री त्यांचा अचानक स्फोट झाल्याची माहिती जमादार यांनी पोलिसांनी दिली.

पोलिसांनी याप्रकरणी अपघातांचा गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Record: W,W,W,W,W... 'बुमराह एक्स्प्रेस' सुसाट! आफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्स घेत रचला इतिहास; अश्विनला टाकलं मागे

Bihar Election Results 2025: 'बिहारच्या जनतेनचा पुन्हा PM मोदींवर विश्वास', मडगावात मुख्यमंत्री सावंतांनी कार्यकर्त्यांसोबत केला NDA चा विजयोत्सव साजरा!

Pooja Naik: "नोकरी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा सहभाग नाही", आरोपी पूजा नाईकचा मोठा खुलासा; तपासाची दिशा बदलली

VIDEO: 'कॅप्टन कूल' माही की 'किंग' कोहली? हरमनप्रीत कौरचा 'फेव्हरेट' कॅप्टन कोण? दिलं 'हे' उत्तर

Pooja Naik: 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्यात 9 जणांची टीम सामील; ढवळीकरांचं नाव घेत केला पूजाने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT