Karapur News : कारापुरात गव्यांचा उच्छाद सुरूच; मळ्यांची नासधूस

Karapur News : वीज दिव्यांचा प्रयोगही ठरला असफल
Karapur
KarapurDainik Gomantak
Published on
Updated on

Karapur News :

डिचोली, कारापूर भागात गव्यांचा अजूनही उच्छाद असून या गव्यांकडून मिरची आणि भाजीच्या मळ्यांची नासधूस सुरूच आहे. जागरण आणि आगीचे भय दाखवूनही गव्यांनी घातलेला धुमाकूळ काही बंद होत नसल्याने कारापूर भागातील शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

आता तर शेतकऱ्यांनी पैसे जमा करून सुमारे २५ हजार खर्च करून मळ्यांभोवती वीज दिवे बसविले आहेत. ऐन पिकाच्यावेळी गव्यांनी मिरची आणि भाजीच्या मळ्यांची नासधूस केल्याने शेतकरी विशेष करून महिला पुरत्या हतबल झाल्या आहेत. यावर्षी आर्थिक नुकसान झाल्यातच जमा आहे, अशी व्यथाही महिला शेतकऱ्यांनी मांडली आहे.

स्वखर्चातून वीज दिवे

गव्यांचा बंदोबस्त करण्यात वन खाते अपयशी ठरत असल्यामुळे आता शेतकरीच पुढे सरसावले आहेत. पुरुषांसह महिला रात्री मळ्याजवळ जमून जागरण करीत आहेत. गव्यांना भय घालण्यासाठी मळ्यांजवळ आग पेटवतात. पहाटेपर्यंत शेतकरी मळ्यांमध्ये थांबतात. गेल्या काही दिवसांपासून हा दिनक्रम चालू आहे.

मात्र, आग पेटवून आणि जागरण करूनही गव्यांचा उपद्रव काही थांबत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्वखर्चातून मळ्यांभोबती वीज दिवे बसवले आहेत. मात्र, विजेचे दिवे बसवूनही फायदा होत नाही. असे या शेतकऱ्यांनी सांगितले.

Karapur
Goa Accident : सरळ रस्त्यावरच बहुतांश अपघात; पोलिसांचे विश्‍लेषण

घरसंसार चालविणे कठीण

मळ्यांमध्ये फुलणारी भाजी बाजारात नेवून त्यातून मिळणाऱ्या मिळकतीतून घरसंसार चालवण्यास मदत होत असते. मात्र, गव्यांच्या धुमाकूळामुळे आता आमची मिळकत बंद झाली आहे. अशी कैफियत मिनिका कवळेकर, राधा सालेलकर आणि अन्य महिलांनी व्यक्त केली.

शेतकरी गलितगात्र

कारापूर येथील ‘कोनगो’ परिसरात ५० हून अधिक शेतकऱ्यांनी मिरची, भाजीचे मळे फुलवले आहेत. मळे फुलल्यानंतर गव्यांचा धुमाकूळ वाढला आहे. मिरची आणि भाज्यांचे पीक हातातोंडाशी आलेले असताना गव्यांचा उच्छाद वाढला आहे.

रात्रीच्यावेळी गवे काटेरी कुंपण मोडून मळ्यांत घुसून ‘पोरसू’ पिकाची नासधूस करतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले. गव्यांच्या धुमाकूळामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासधूस होत असल्यामुळे शेतकरी पुरते गलितगात्र बनले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com