Turtle Conservation Dainik Gomantak
गोवा

सीआरझेड उल्लंघन प्रकरणी GCZMA कडून 104 जणांना दंड वसुलीच्या नोटीसा

कासवांच्या घरट्यांच्या संरक्षणासाठी पाऊल; उत्तर गोव्यातील 62 तर, दक्षिण गोव्यातील 42 जणांना दंड

गोमंतक ऑनलाईन टीम

GCZMA Issues Notice to Norm Violators: गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (जीसीझेडएमए) ने सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) च्या नॉर्म्सचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या व्यक्ती आणि आस्थापनांना दंड आकारण्याच्या नोटिसा जारी केल्या आहेत.

अशा एकूण 104 प्रकरणांमध्ये पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारण्यात आली असून त्यापैकी 62 प्रकरणे उत्तर जिल्ह्यातील आणि 42 प्रकरणे दक्षिण जिल्ह्यातील आहेत.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका नवीन समितीला कासवांच्या घरट्यांबाबत CRZ उल्लंघनाच्या 148 प्रकरणांसाठी पर्यावरणीय नुकसान भरपाईची गणना करण्याचे काम सोपविले होते. नवीन समिती 148 प्रकरणांसाठी पर्यावरणीय नुकसान भरपाईच्या मुल्यांकनासाठी जबाबदार असेल.

148 प्रकरणांपैकी 86 प्रकरणे उत्तर गोव्यातील किनाऱ्यावरील कासवांच्या घरट्यांशी संबंधित आहेत. तर उर्वरित 62 प्रकरणे दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांवरील कासवांच्या घरट्यांशी संबंधित आहेत.

तपासात नवीन समितीला अनेक अडचणी आल्या. कारण अनेक उल्लंघनकर्त्यांनी संरचना उद्ध्वस्त केल्या आणि त्यांच्या आस्थापनांची नावे देखील बदलली, त्यामुळे पॅनेलला उल्लंघनाचे अचूक क्षेत्र निश्चित करणे कठीण झाले.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी, GCZMA ने योग्य परवानगीशिवाय बेकायदेशीर बांधकाम केल्याचा पुरावा म्हणून पूर्वी भरलेल्या दंडाचा विचार करून, विविध प्रकारच्या उल्लंघनांसाठी सरासरी क्षेत्र मोजण्याचा निर्णय घेतला.

समितीने शॅक, रेस्टॉरंट्स आणि लाकडी बांबूच्या बांधकामासाठी 144 चौरस मीटर; कॉटेजसाठी 25 चौरसमीटर, तंबू, छत आणि टेबल आणि खुर्ची सेट अप साठी 1.4 चौरस मीटर आणि शौचालयासाठी 1.5 चौरस मीटर सरासरी क्षेत्र निश्चित्त केले आहे.

12 जून रोजी झालेल्या GCZMA च्या बैठकीत अहवाल स्वीकारला आणि सर्व उल्लंघन करणाऱ्यांना निर्देश जारी केले.

GCZMA ने आता उल्लंघन करणार्‍यांना वसुलीच्या नोटिसा जारी केल्या आहेत, ज्यात उत्तर गोव्यातील उल्लंघनकर्त्यांना एकूण 2.61 कोटी रुपये आणि दक्षिण गोव्यातील उल्लंघनकर्त्यांना 1.42 कोटी रुपये दंड वसुलीसाठी नोटीस पाठवली गेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kadamba Bus Stand: 'हेच का ते खड्डेमय झालेले पंचतारांकित बसस्थानक'? गोवा काँग्रेसचा सवाल; रस्त्यावर ठिय्या मारून नोंदवला निषेध

Shubman Gill: टी-शर्ट आणि ऑटोग्राफ असणारी कॅप! गावस्करांनी 'ओव्हल'मध्ये शुभमन गिलला दिले खास गिफ्ट VIDEO

Accident News: भीषण अपघात! देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; 11 जणांचा मृत्यू VIDEO

भू-विनाश, वंशपरंपरागत घरांवर बुलडोझर, पण बेछूटपणे फैलावणाऱ्या झोपडपट्ट्यांची होतेय पाठराखण

RJ Mahavash युझीची गर्लफ्रेंड? घटस्फोटानंतर नवीन नात्याबद्दल स्पष्टच सांगितलं,''पुन्हा प्रेमात पडण्याची भीती...''

SCROLL FOR NEXT