Loan Dainik Gomantak
गोवा

गोव्यात बँकांचं आडमुठं धोरण! पीएम रोजगार योजनेच्या कर्जांसाठी जीसीसीआयने सुचवल्या 'या' उपाययोना

Prime Ministers Employment Generation Programme: राज्यात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे.

Manish Jadhav

राज्यात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र, कर्ज देण्याच्या प्रक्रियेत आणखी सुलभता आणण्याची गरज असल्याचे निवेदन जीसीसीआयने उद्योग संसदीय स्थायी समितीला दिले. एवढ्यावरचं न थांबता जीसीसीआयने बँकांना सूचना करण्याचे देखील सूचित केले. समितीचे अध्यक्ष खासदार तिरुची एन. सिवा गोवा दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या.

पहिल्या पिढीतील उद्योजकांसाठी योजना

दरम्यान, जीसीसीआयने अध्यक्ष तिरुची. एन. सिवा यांनी बोलताना सांगितले की, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही पहिल्या पिढीतील उद्योजकांसाठी तयार करण्यात आली. मात्र असे असूनही अनेक बँका पीएमईजीपी अर्जांची व्यावसायिक कर्जांप्रमाणेच पडताळळी करतायेत. एवढचं नाहीतर बँका कंपनीकडून, संचालकांकडून वैयक्तिक हमी घेण्याचा आग्रहही धरतायेत.

समीतीने काय उपाययोजना सुचवल्या?

दुसरीकडे, दरवर्षी कर्ज देण्यात येणाऱ्या युनिटची संख्या वाढवणे, राज्यातील क्रेडिट-ठेवी गुणोत्तर वाढवणे, कर्ज मूल्याच्या 100-150 टक्के पेक्षा जास्त सुरक्षिततेचा आग्रह न धरणे, कर्जाच्या प्रस्तावांना 60 दिवसांच्या आत मंजुरी देणे किंवा ते नाकारणे अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ironman 70.3 Goa: भारतीय सैन्यदलातील बिश्वरजीत सायकोम ठरले ‘आयर्नमॅन’चे विजेते, इजिप्तची यास्मिन हलावा महिलांमध्ये अव्वल

रशिया - युक्रेन युद्ध आंतरराष्ट्रीय शांततेसाठी मोठा धोका; जर्मन चान्सलर स्कोल्झ यांचे गोव्यात वक्तव्य

Manohar International Airport: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब धमकीचा कॉल आल्याने खळबळ!

Goa Crime: शिक्षिकेच्या नोकरीचे आमिष दाखवत महिलेला 15 लाखांचा गंडा, पोलीस कर्मचाऱ्यास अटक; फोंड्यातील घटना

Goa News Updates: भूतानी प्रकल्पाविरुद्धच्या आंदोलनाला गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT