Gautam Verlekar|Rahul Prabhudesai|Mt Kang Yatse AIZ
गोवा

मडगावच्या दोघांची ‘माऊंट कांग यात्से’ला गवसणी! नायमलिंग येथे ५,१०० मीटरवर तळ उभारणी करुन मोहीम यशस्वी

Trekking: मडगाव येथील गौतम वेर्लेकर व राहुल प्रभुदेसाई यांनी लडाखमधील माऊंट कांग यात्से १ व २ शिखर मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मडगाव येथील गौतम वेर्लेकर व राहुल प्रभुदेसाई यांनी लडाखमधील माऊंट कांग यात्से १ व २ शिखर मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. गोव्यातील गिर्यारोहकांसाठी हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरले आहे.

२३ ते २७ ऑगस्ट या कालावधीत शंभर तासांत (पाच दिवस) ६,२०० मीटरपेक्षा जास्त उंचीची दोन शिखरे सर करणारा राहुल हा गोव्यातील पहिलाच गिर्यारोहक ठरला. गोवा अल्पाईन क्लबतर्फे मोहीम आखण्यात आली होती आणि त्यास बूट्स अँड क्रॅम्पन्सच्या पाठिंबा लाभला. मोहिमेसाठी नायमलिंग येथे ५,१०० मीटरवर तळ उभारण्यात आला होता.

गोव्यातील गिर्यारोहकांसाठी हे वर्ष एक महत्त्वपूर्ण ठरले आहे. यावर्षी माऊंट एव्हरेट सर करणारा पहिला गोमंतकीय हा मान पंकज नार्वेकर याने मिळविला. करिश्मा वेर्लेकर हिने ‘माऊंट मेरा’वर एकटीने चढाई केली. राहुल वेर्लेकर चार्टर्ड अकाउंटंट असून गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनचा (जीएसआयए) सक्रिय व्यवस्थापकीय सदस्य आहे. राहुल प्रभुदेसाई तरुण उद्योजक असून गोव्यातील अव्वल गिर्यारोहक आहे. तो माउंट एव्हरेस्टच्या दक्षिण शिखरावर पोहोचणारा पहिला गोमंतकीय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT