Gauri Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Gauri Dhavalikar : थेट इंडिगोची पायलट बनली; गोमंतकन्येची गगनभरारी

गौरी ढवळीकरने जिद्दीने आणि चिकाटीने आपला प्रवास पूर्ण करत यशस्वीपणे कमर्शियल पायलट म्हणून रुजू होण्याचा मान मिळवला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

-आसावरी कुलकर्णी

आजकालची युवा पिढी आव्हानांना लीलया तोंड देणारी आहे. कठीण दिसणाऱ्या वाटा सहजपणे पार करत ध्येय गाठणारी आजची तरुणाई आहे. अशाच एका वेगळ्या क्षेत्राची निवड करून ते यशस्वीपणे करून दाखवायचं एक आव्हान पेललं आहे गौरीने. गौरी दीपक ढवळीकर इंडिगो  विमान कंपनीत वैमानिक म्हणून निवडली गेली आहे. आपण बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत हा टप्पा तिने गाठला. हा प्रवास खडतर होता, खाचखळग्यांचा होता, पण ती डगमगली नाही. आणि आज मोठ्या दिमाखात इंडिगो या वैमानिक कंपनीत पायलट म्हणून रुजू झाली.

आपल्या कर्तृत्ववान कन्येच्या दैदिप्यमान यशावर भरभरून येणारे हे शब्द गौरीच्या वडिलांचे. गोव्यातल्या राजकारणात आपले स्थान निर्माण करणारे माजी आमदार दीपक ढवळीकर हे गौरीचे वडील. पण या यशाबद्दल बोलताना मात्र ते फक्त गौरीचे वडील म्हणूनच बोलत होते. गौरी आपल्या सेवेत रुजू होण्याच्या गडबडीत असल्यामुळे दिल्लीत आहे, तिच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधता आला नाही. पण दीपक ढवळीकर यांनी अतिशय कौतुकाने आपल्या कन्येच्या प्रवासाबद्दल सांगितले.

शालेय जीवनापासूनच गौरी प्रचंड हुशार होती. दहावी, बारावी मध्ये 95 टक्क्यांच्या खाली तिने मार्क कधीच घेतलेच नाहीत. त्यानंतर गोव्याच्या NIt मधून कॉम्प्युटर विषयामध्ये इंजिनियरिंग केले. तिला आयआयटीमध्ये जायचे होते पण तिला ते शक्य झाले नाही पण पायलट बनण्याचे स्वप्न कायम होते.

इंडिगो कंपनीच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी तिची निवड झाली. यानंतर गोंदिया येथे वैमानिक होण्यासाठी प्राथमिक धडे घेतले. यामध्ये विमानाच्या तांत्रिक बाजू तिला समजून घेता आल्या. नंतर पुढील शिक्षणासाठी तिला अमेरिकेत जावे लागले. तिथले व्यावसायिक पायलट बनण्याचे खडतर शिक्षण घेऊन गौरी भारतात परतली. अमेरिकेतल्या प्रशिक्षणात सिंगल इंजिन विमान चालवल्यांतर भारतात येऊन एव्हिएशन डिपार्टमेंटचे लायसन्स मिळवणे हा पुढला भाग होता.

डबल इंजिन विमानाचे प्रशिक्षण या वेळी तिने घेतले आणि आता उत्कृष्ट कामगिरी करत ती इंडिगो कंपनीत कमर्शियल पायलट म्हणून रुजू झाली. आपल्या राजकीय वजनाचा कुठेही वापर केला नाही, आणि जे काही मिळवले ते तिने स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवले हे सांगताना दीपक ढवळीकरांचा चेहरा उजळून निघतो. आम्हाला आमच्या मुलीचा सार्थ अभिमान आहे, असं ते सांगतात.

पहिल्यापासूनच गौरीला साहसी प्रवासाची प्रचंड आवड होती. तसेच तिला प्राणी आवडतात, प्रवास करायला आवडतो असे ढवळीकर यांनी सांगितले. गोव्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महिला पायलट्स आहेत. दोन वर्षापूर्वी रिचा गोवेकर या साखळी येथील मुलीने कमर्शियल पायलट होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर गौरी ढवळीकरने जिद्दीने आणि चिकाटीने हा प्रवास पूर्ण करत यशस्वीपणे कमर्शियल पायलट म्हणून रुजू होण्याचा मान मिळवला आहे. 

25 वर्षीय गौरीची प्रेरणा आजकालच्या युवापिढीने घ्यावी आणि सरकारी नोकरीच्या मागे न लागता वेगळ्या वाटा निवडाव्यात असे ढवळीकर म्हणाले. आकाशाला कवेत घेऊ पहाणाऱ्या गौरी सारख्या अनेक युवतींच्या पंखात बळ येवो हीच सदिच्छा...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Army Jawan Assaulted: देशरक्षकच असुरक्षित? लष्कराच्या जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून मारहाण, 6 जण अटकेत

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

Pune-Sindhudurg Flight: पुण्यातील कोकणवासियांना बाप्पा पावला... गणेश चतुर्थीनिमित्त 'Fly91'च्या उड्डाण संख्येत वाढ, वाचा सविस्तर

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

कारच्या धडकेत एका मुलीसह आठ जण जिवंत जाळले; गुजरातमधील घटना

SCROLL FOR NEXT