Ponda: फोंडा वाहतूक पोलिसांनी फोंडा व धारबांदोडा तालुक्यांतील विविध ठिकाणी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून 1,90,72,550 रुपयांचा महसूल गोळा केला आहे. मावळत्या वर्षी विनाहेल्मेट, धोकादायक पार्किंग व फिल्मिंग कार चालकांविरुद्ध अधिक कारवाई झाल्याची नोंद वाहतूक पोलीस स्थानकात दिसून आली.
मावळत्या वर्षी सर्वाधिक विनाहेल्मेट 6,229 धोकादायक पार्किंग 7,193 व फिल्मिंग कार 5,039 चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्याशिवाय वेगाने वाहन चालविणे 2,076 ओव्हर टेकिंग 479 दारूच्या नशेत वाहन चालविणे 143 वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे 107, विना सीट बेल्ट 3,551 नो एंट्री4,380 विना नंबर प्लेट 1,088 व्यवस्थित नंबर प्लेट नसने ३,६०९ व अन्य नियमभंग केलेल्या चालकांविरुद्ध ही कारवाई केली.
फोंडा वाहतूक पोलिसांनी 2021साली एकूण 44,925 वाहनचालकांविरूद्ध कारवाई करून 71,23,150 रुपयांचा महसूल गोळा केला होता. परंतु 2022 साली दुप्पट महसूल गोळा करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे. मुख्य म्हणजे यावर्षीपासून कडक वाहतूक नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याने अधिक महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे.
विविध ठिकाणी वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी कारवाई करण्यासह लोकांमध्ये जागृतीही करीत आहेत.
हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनाही वाहतूक नियमांचे धडे दिले जात आहेत. वाहतूक नियमांचे पालन करून रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.- कृष्णा सिनारी, वाहतूक निरीक्षक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.