Gauri Achari Murder Case  Dainik Gomantak
गोवा

Gauri Achari Murder Case: महत्वाची बातमी! गौरव बिद्रेचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळला

गौरी आचारीच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले होते.

Kavya Powar

Gauri Achari Murder Case: मागील वर्षी जुने गोवे येथे प्राध्यापक गौरी आचारी खून प्रकरणात पणजी सत्र न्यायालयाने संशयित आरोपी गौरव बिद्रे याच्यावर गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले. अटक केल्यापासून गौरव तुरुंगातच असून जामीनासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्येक वेळेप्रमाणे त्याचा यावेळचा अर्जही मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळला आहे.

असे होते संपूर्ण प्रकरण....

गौरी आचारीच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले होते. गौरीचा गळा आवळून तिचा खून केलेल्या संशयित गौरव ब्रिदेने कदंब पठारावरील झाडीत तिचा मृतदेह टाकून दिला होता. या प्रकरणाचा तपास जुने गोवेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांनी करताना संशयिताला 24 तासाच्या आत अटक केली होती. त्यानेही त्यावेळी खुनाची कबुली दिली.

त्यामुळे तपासकामातील साक्षीदार तसेच गौरी व गौरव यांच्यात घटनेच्या शेवटच्या क्षणी मोबाईलवरून झालेल्या संभाषणाची तसेच व्हॉटसअप मेसेजेस माहितीसाठी ते फॉरेन्सिक लेबोरेटरीकडे पाठवण्यात आले होते.

शेवटी सर्व पुरावे गोळा झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आले. आरोपी गौरव सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असूनही गुन्ह्याचे गांभीर्य पाहता कोर्टाने त्याचे आजवरचे अर्ज फेटाळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT