Gas Leak Fire Incident Dainik Gomantak
गोवा

Gas Leak Fire Incident: गॅस गळतीने घरात आगीचा भडका; गोव्यात मायलेकी होरपळल्या, गोमेकॉत उपचार सुरू

Vasco Gas Leak Fire Incident: नवे वाडे येथील लास्ट बसस्टॉपसमोरील घरात घरगुती गॅस सिलिंडरला गळती लागून गुरुवारी पहाटे अचानक आगीचा भडका उडाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: नवे वाडे येथील लास्ट बसस्टॉपसमोरील घरात घरगुती गॅस सिलिंडरला गळती लागून गुरुवारी पहाटे अचानक आगीचा भडका उडाला. या घटनेत हेमा कोचरे पाटील (५०) आणि त्यांची मुलगी सुमित्रा (२५) होरपळल्या. त्यांना उपचारासाठी गोमेकॉच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पहाटे पावणेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. घरातून मोठा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ १०८ रुग्णवाहिका, पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. परिसरातील युवकांनीही मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी छप्परावरील सिमेंट पत्रे बाजूला केल्यानंतर हेमा आणि सुमित्रा जखमी अवस्थेत घराबाहेर पडल्या.

पीडितांना मदत देणार!

आमदार कृष्णा साळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडिताना मुख्यमंत्री सहाय्य निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सुरक्षिततेबाबत अग्निशमन दलाच्या नियमांची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

Goa Agriculture: गोव्यात पावसाच्या तुटवड्याचा भातशेतीला फटका; 25 हेक्टर क्षेत्राचे नुकसान, शेतकऱ्यांना अर्जाचे आवाहन

IND vs WI: अभिषेक शर्माला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! SKYचा मोठा रेकॉर्ड निशाण्यावर; दुसऱ्या टी-20 सामन्यात गोल्डन चान्स

VIDEO: मडगाव रेल्वेस्थानक परिसरात एफडीएची धडक कारवाई; 408 किलो मांस जप्त

FDA Raid: गोव्यात विनापरवाना कॅटरर्स, पार्टी हॉलवर एफडीएचा बडगा; तीन आठवड्यांत परवाना घ्या, अन्यथा 10 लाखांपर्यंत दंड!

SCROLL FOR NEXT