drone Dainik Gomantak
गोवा

हायटेक शेतीला प्रोत्साहन; गोवा सरकार आणि गरुड एरोस्पेसच्या वतीने राज्यात ड्रोन यात्रा उपक्रम

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे, शेतकरी आता नॅनो युरिया स्प्रे करण्यासाठी वापरू शकतात.

Pramod Yadav

Garuda Aerospace to collaborate with Goa Department of Agriculture

गरुडा एरोस्पेस भारतातील अग्रगण्य ड्रोन निर्माता कंपनी आहे. गरुडा अत्याधुनिक किसान ड्रोनसह भारतातील कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्यासाठी सज्ज आहे. गरुडाच्या ड्रोन तंत्रज्ञानाने अनेक राज्यात वाहवा मिळवली आहे.

गोवा सरकार कृषी संचालनालयाने गरुड एरोस्पेसला राज्यात ड्रोन यात्रा उपक्रम आयोजित करण्यासाठी आमंत्रित केले आहे. शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि जागरूकता निर्माण करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.

राज्यातील कृषी पद्धती सुधारण्यासाह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे यासाठी हा संयुक्त उपक्रम आयोजित केला जात आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे, शेतकरी आता नॅनो युरिया स्प्रे करण्यासाठी वापरू शकतात.

याद्वारे शेतीची उत्पादकता देखील वाढवता येईल. एक महिन्याच्या कालावधीत 100 गावांमध्ये ड्रोन यात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.

"आम्हाला गोवा राज्यात ड्रोन यात्रा सुरू करण्याचा आनंद होत आहे. शेतकर्‍यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासह शेतकर्‍यांचे जीवन सुधारून उत्पादकता वाढवणे हे आमचे धोरण आहे." असे गरुड एरोस्पेसचे संस्थापक आणि सीईओ अग्निश्वर जयप्रकाश म्हणाले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी 2022 मध्ये ड्रोन यात्रा 2.0 ला हिरवा झेंडा दाखवून संपूर्ण भारतातील 755 जिल्हे कव्हर करण्याच्या या प्रकल्पाला मंजुरी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT