Mapusa Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Council: म्हापसा पालिकेचा अजब-गजब कारभार

Mapusa Municipality Garbagea Issue: म्हापसा शहरातील विविध ठिकाणी व रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग जैसे थे स्थितीत पडून आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: म्हापसा शहरातील विविध ठिकाणी सध्या ब्लॅक स्पॉट्स, कलेक्शन पॉइंट्स व रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग जैसे थे स्थितीत पडून आहेत. हा कचरा उचलण्यास पालिकेजवळ वेळ नाही; परंतु रहिवासी नसलेल्या खासगी इमारतींमधील कचरा उचलण्यास पालिकेचे कर्मचारी जुंपले जात असल्याने पालिकेच्या या अजब कारभाराबाबत नगरसेवकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.

तसेच या प्रकारात गुंतलेल्या संबंधितांना निलंबित करावे, अशी मागणी नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी केली.

याविषयी नगरसेवक अ‍ॅड. शशांक नार्वेकर यांंनी माहिती दिली की, आपल्या प्रभागात नवीन प्रकल्प आला आहे. तिथे अद्याप कुणीही रहिवासी राहत नाही. तरीही पालिकेच्या सात कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी तेथील कचरा उचलला.

नगरसेवकांकडून संताप व्यक्त

दरम्यान, नुकतीच म्हापसा पालिकेत नगरसेवकांसोबत शहरातील कचरा व्यवस्थापन कोलमडल्याने संयुक्त बैठक झाली होती. यावेळी नगरसेवकांनी पालिका अधिकारी, अभियंते, पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभाराविषयी धारेवर धरले होते.

तेव्हा तीन दिवसांत कचरा उचलला जाईल, असे आश्वासन उपस्थितांना देण्यात आले होते. परंतु अद्याप कचरा उचलण्यास पालिकेला वेळ मिळालेला नाही. मात्र, खासगी इमारतींमधील कचरा उचलण्यास पालिका वेळ आणि मनुष्यबळ उपलब्ध करीत असल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 WC 2026: आफ्रिकेचा 'विजयी षटकार'! वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत सेमीफायनलचं तिकीट केलं पक्क; मार्करमची तुफानी खेळी ठरली निर्णायक VIDEO

Shirgao Lairai Jatra: ''6 मार्चपर्यंत क्राउड मॅनेजमेंट प्लॅन सादर करा'', शिरगाव जत्रेबाबत हायकोर्टाचा कडक आदेश; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सरकारला अल्टिमेटम

Budh Vakri 2026: 23 दिवसांचा 'राजयोग'! बुधाची वक्री चाल पालटणार 'या' 3 राशींचं आयुष्य; 21 मार्चपर्यंत बरसणार पैशांचा पाऊस

Goa Crime: मायणा-कुडतरीत खळबळ! फूस लावून पळवून अल्पवयीन मुलीचं अपहरण, संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; पालकांचा गंभीर आरोप

Operation Sindhur 2.0: 'ऑपरेशन सिंदूर 2.0' ने उडणार पाकड्यांचा थरकाप, भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचा थेट इशारा; शत्रूच्या छाताडावर नाचणार 'भैरव' सैन्य! VIDEO

SCROLL FOR NEXT