Garbage management sonsodo
Garbage management sonsodo Dainik Gomantak
गोवा

सोनसोडो येथील जमीन होणार कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या स्वाधीन

दैनिक गोमन्तक

मडगाव : सोनसोडो येथे नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासाठी पालिकेच्या मालकीची 15 हजार चौ. मी जागा घन कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या ताब्यात देण्याचा ठराव आज झालेल्या मडगाव पालिकेच्या बैठकीत संमत करण्यात आला. (Garbage management will take place on the land at Sonsodo)

सोनसोडोची ही जमीन महामंडळाकडे दिल्यानंतर या जागेत कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रत्येकी 25 टन क्षमतेचे दोन बायो डायजेस्टर प्रकल्प बसविण्यात येणार असून कचरा प्रक्रियेची सर्व हाताळणी हे महामंडळच करणार आहे. नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत रोजंदारी वरील सफाई कामगारांना दर दिवशी 500 रुपया ऐवजी 700 रुपये वेतन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

गोवा मुक्ती हिरक महोत्सव निधीतून मडगाव आणि फातोर्डा येथे दोन फुटसाल मैदाने उभारण्यात येण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मडगाव पालिकेने शहरात तीन ठिकाणी विक्रेते विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तिथे जुन्या गाडेवाल्यांचे सर्वात आधी पुनर्वसन करावे अशी सूचना आज नगरसेवक महेश आमोणकर यांनी यावेळी केली. नगराध्यक्ष परेरा यांनी त्यास मान्यता दिल्याचे आमोणकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Savoi Verem : निशानने धाग्यातून टिपला ‘द ग्लो ऑफ आई लईराई’;सावईवेरेतील युवा कलाकाराची कलाकृती

Goa Today's Live News: मिरामार येथे अंगावर वीज पडून केरळच्या एकाचा मृत्यू

Digilocker Result : ‘डिजिलॉकर’वर निकाल देणारे गोवा दुसरे राज्य

France Violence: फ्रान्समध्ये हिंसाचाराचा भडका! न्यू कॅलेडोनियात आणीबाणी लागू; 4 जणांचा मृत्यू, 5,000 दंगलखोरांवर कारवाई

Bicholim News : धावत्या दुचाकीवर कोसळली फांदी; वाहतूक खोळंबली

SCROLL FOR NEXT