Garbage Issue Dainik Gomantak
गोवा

Garbage Issue: कचरा टाकणाऱ्यांवर असणार पाळत! कुर्टी खांडेपार येथील पुलांवर बसवले सीसीटीव्ही कॅमेरे

राज्यातील कचऱ्याची समस्या काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Kavya Powar

Garbage Issue: राज्यातील कचऱ्याची समस्या काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला अनेकजण खुलेआम कचरा टाकत असल्यामुळे ही समस्या वाढत आहे. कुर्टी खांडेपार पंचायतीतर्फे याच विषयावरून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

कुर्टी खांडेपार येथील पुलांवरून वाहनचालक खाली नदीत कचरा फेकत असल्याचे समोर आले होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही पुलांवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले आहेत.

यातून पुलावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जर कुणीही नदीत कचरा टाकताना दिसले तर त्यांच्या बाबत कठोर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे कुणीही इथून पुढे असे कृत्य करू नये, असे आवाहन सरपंच संजना नाईक यांनी केले आहे.

दरम्यान, मेरशी तसेच सांताक्रुज ग्रामपंचायत कर आकारून घरोघरी जाऊन कचरा गोळा करत असतानाही महामार्गावर दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्यात येत आहे. रहिवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून पंचायतीने कारवाई करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची विनंती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa nightclub fire: गोव्यातील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू, हडफडेच्या रोमिओ लेनमध्ये घडली घटना

Indigo Flights Cancelled: इंडिगोची पुन्हा 14 उड्डाणे रद्द! दाबोळीवर प्रवाशांचे हाल; पर्यटन हंगामावरही परिणाम

Goa Politics: सांताक्रुझ, शिरोडा, हणजूणवरून अडले युतीचे घोडे! ठाकरेंची सरदेसाई, परब यांसोबत बैठक; काय होणार घोषणा? राज्याचे लक्ष

Horoscope: आर्थिक स्थैर्य मिळण्याची चिन्हे, परदेशाशी संबंधित कामांसाठी दिवस 'शुभ'; मात्र शत्रूपासून सावध राहा!

IND vs SA: सलामी जोडीची 'सुपर-पॉवर'! रोहित-जयस्वाल ठरले तेंडुलकर-गांगुलीपेक्षाही अधिक 'विस्फोटक', 25 वर्षांचा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT