Gauri Achari Murder Case: मागील वर्षी जुने गोवे येथे प्राध्यापक गौरी आचारी खून प्रकरणात पणजी सत्र न्यायालयाने संशयित आरोपी गौरव बिद्रे याच्यावर गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले. अटक केल्यापासून गौरव तुरुंगातच असून जामीनासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्येक वेळेप्रमाणे त्याचा यावेळचा अर्जही मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळला आहे.
गौरी आचारीच्या हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरून गेले होते. गौरीचा गळा आवळून तिचा खून केलेल्या संशयित गौरव ब्रिदेने कदंब पठारावरील झाडीत तिचा मृतदेह टाकून दिला होता. या प्रकरणाचा तपास जुने गोवेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांनी करताना संशयिताला 24 तासाच्या आत अटक केली होती. त्यानेही त्यावेळी खुनाची कबुली दिली.
त्यामुळे तपासकामातील साक्षीदार तसेच गौरी व गौरव यांच्यात घटनेच्या शेवटच्या क्षणी मोबाईलवरून झालेल्या संभाषणाची तसेच व्हॉटसअप मेसेजेस माहितीसाठी ते फॉरेन्सिक लेबोरेटरीकडे पाठवण्यात आले होते.
शेवटी सर्व पुरावे गोळा झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आले. आरोपी गौरव सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असूनही गुन्ह्याचे गांभीर्य पाहता कोर्टाने त्याचे आजवरचे अर्ज फेटाळले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.