Garbage in Ponda Dainik Gomantak
गोवा

फोंड्याला कचरामुक्त करण्याची नागरिकांची मागणी

कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज, नागरिकांचं आरोग्य धोक्यात

दैनिक गोमन्तक

फोंडा : गोव्यात सध्या ठिकठिकाणी कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फोंडा शहरातही अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आजारांच्या धोक्यासह दुर्गंधीचाही सामना नागरिकांना करावा लागत आहे. (Garbage in Ponda News Updates)

फोंडा (Ponda) पालिकेसह आसपासच्या ग्रामपंचायतींकडून स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र असं असलं तरीही परिसरातील कचऱ्याची समस्या जैसे थे असल्याचं चित्र आहे. पर्यटकांकडूनही बेजबाबदार वर्तन कचरावाढीस कारणीभूत ठरत असल्याचं दिसून आलं आहे. फोंडा कदंब बस स्थानकापासून ते फर्मागुडीपर्यंतच्या रस्त्याशेजारी सातत्याने कचरा टाकला जातो. शनिवारी-रविवारी अनेकजण आपल्या घरातील कचरा किंवा टाकावू वस्तू फेकण्यासाठी या ठिकाणी येतात. त्यामुळे कचऱ्याची (Garbage) समस्या कमी होताना काही दिसत नाही.

या परिसराची नियमितरित्या साफसफाई होत नसल्याने कदंब स्थानकाजवळ कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. जर हा कचरा उचलला गेला नाही, तर याचा दुसरा सोनसोडो (Sonsodo) व्हायला वेळ लागणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. यासोबतच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या भागात गस्त वाढवून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसंच दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT