Garbage Vehicle Goa Dainik Gomantak
गोवा

नादुरुस्त वाहनांमुळे मडगावातील कचरा उचल ‘थांबली’

मडगावातील समस्येत वाढ: कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव नगरपालिकेचे कचरावाहू ट्रक आणि कॉम्पॅक्टर अत्यंत जुने झाले असून अनेकवेळा ते काम सुरू असतानाच नादुरुस्त होतात. याबरोबरच त्यांचे टायरही पंक्चर होतात. अशाने कचरा उचल वेळेवर होत नसल्याने तो काही दिवस तसाच पडून राहतो. शिवाय नागरिकांना दुर्गंधीचाही त्रास सहन करावा लागतो.

सोमवारी आके येथील सिने विशांत थिएटरजवळ कचरा वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा टायर सकाळच्या सत्रात पंक्चर झाल्याने काही तासांसाठी कचरा उचल ठप्प पडली होती. सकाळी 8 वाजता पंक्चर झालेल्या या ट्रकची दुरुस्ती 11 वाजल्यानंतर पूर्ण करण्यात आली.

भंगार कचरा वाहनांसाठी त्रासदायक

चार दिवसांपूर्वी एक ट्रक नादुरुस्त झाल्याने आके, पॉवर हाऊस व अन्य ठिकाणची कचरा उचल चार-पाच दिवस करण्यात आली नव्हती. यातील काही ठिकाणी कचऱ्याला उग्र वास येत होता. मडगाव नगरपालिकेतील कचरा वाहतूक करण्यासंबंधी निगडित असलेल्या एका कर्मचाऱ्याने ट्रकविषयी सांगितले, की सोनसोडो कचरा यार्डवर लोखंडी भंगाराचा कचरा येतो. यात लोखंडी टोकदार वस्तू तसेच खिळेही असतात. त्यामुळे कचरा वाहतूक करणारे ट्रक वारंवार पंक्चर होतात.

कचरा वाहतूक करणारे ट्रक आणि कॉम्पॅक्टर अत्यंत जुने झाले आहेत. एकंदरीत ८ वाहने कचरा वाहतुकीसाठी वापरण्यात येत आहेत. या जुन्या झालेल्या ट्रकच्या जागी नवे ट्रक घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.

- आग्नेल फर्नांडिस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT