Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

कचरा आणि स्क्रॅपयार्डची गोवा खंडपीठाकडून दखल

चिंबल, मेरशी, सांताक्रुझ पंचायतींची कानउघाडणी

दैनिक गोमन्तक

पणजी: तिसवाडी तालुक्यातील मेरशी, चिंबल तसेच सांताक्रुझ पंचायत परिसरात अजूनही कचऱ्याचे ढीग (ब्लॅकस्पॉटस्) अजूनही असल्याचे तसेच मेरशी ते रायबंदर रस्त्याच्या बाजूने स्क्रॅपयार्ड उभे राहिले असल्याची माहिती ॲड. आयरिशरॉड्रिग्ज यांनी निदर्शनास आणून देताच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने या पंचायतींची कानउघाडणी करत येत्या १३ एप्रिलपर्यंत स्थिती अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

मेरशी, चिंबल व सांताक्रुझ या परिसरातील कचऱ्यांचे ढीग अजून निदर्शनास येत असल्याची छायाचित्रे खंडपीठासमोर अर्जासोबत सादर केली. यावेळी पंचायतींच्या वकिलांनी कचरा विल्हेवाटीसंदर्भात तसेच एमआरएफ सुविधा उभारण्यात येत असलेल्या अडचणींचा उल्लेख केला, तर छायाचित्रात दिसत असलेला कचरा उचलण्यात आल्याची माहिती वकिलांनी दिली. गोवा खंडपीठाने मांडण्यात आलेली कारणे याची दखल न घेता दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

वारंवार निर्देश देऊनही फक्त कारणे पुढे केली जातात, तर यासंदर्भात ॲडव्होकेट जनरलांना नियमानुसार पुढील कारवाईसाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना पावले उचलण्याच्या सूचना केल्या. या स्वेच्छा याचिकेवरील सुनावणीवेळी पंचायतींकडून कचरामुक्तसंदर्भात प्रतिज्ञापत्र दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हे कचऱ्याचे ढीग आढळून येत आहेत. त्यामुळे ते उचलण्यासंदर्भात केलेल्या कृतीची माहिती देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

SCROLL FOR NEXT